गडचिरोली : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर ‘सेवा पंधरवडा’ म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या पंधरवड्यात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिरे, आरोग्य मेळावे, मॅरेथॉन स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात येणार असून त्याच्या नियोजनासाठी गडचिरोली भाजपाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक यमुना लॉन येथे पार पडली.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विदर्भाचे प्रमुख संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार, माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आमदार मिलिंद नरोटे, जेष्ठ मार्गदर्शक बाबुराव कोहळे, माजी आमदार डॉ. देवराव होळी उपस्थित होते.
तसेच जिल्हा अध्यक्ष रमेश बारसागडे, माजी जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे व प्रशांत वाघरे, महिला मोर्चा प्रदेश चिटणीस रेखा डोळस, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री प्रशांत गेडाम, प्रदेश सदस्य रवी ओलारवार, माजी आमदार नामदेव उसेंडी व क्रिष्णा गजभिये, डॉ. भारत खटी, शहर अध्यक्ष अनिल कुणघाडकर, तालुका अध्यक्ष दत्तू सूत्रपवार, सदानंद कुथे, प्रशांतजी कुत्तरमारे, विलासजी भांडेकर, बबलूभाऊ हुसेनी, युवामोर्चा अध्यक्ष मधुकरजी भांडेकर, जिल्हा अध्यक्ष योगिताताई पिपरे, जिल्हा महामंत्री गीताताई हिंगे, माजी जिल्हा अध्यक्षा योगिताताई भांडेकर, चंदाताई कोडवते व संगीताताई रेवतकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.