
गडचिरोली :
भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करण्यात आला. भाजपा महिला आघाडी प्रदेश सचिव सौ. रेखाताई डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा महामंत्री सौ. गीता हिंगे आणि महिला आघाडी जिल्हाध्यक्षा व माजी नगराध्यक्षा सौ. योगिता प्रमोद पिपरे यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकात हे निषेध आंदोलन पार पडले.
या वेळी भाजपकडून असा आरोप करण्यात आला की, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची विचारधारा ही समाजात विष पेरणारी असून नारीशक्तीचा अपमान करणारी आहे. पंतप्रधानपद हे देशाचे असते, आणि त्यांच्या मातोश्रींबद्दल बोलताना अपशब्द वापरणे तसेच त्यांचे चुकीचे चित्रण करणे हा देशातील मातृशक्तीचा अपमान आहे. देशातील मातृशक्ती काँग्रेसचे असे विष कधीही सहन करणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
बिहार निवडणुकीचा मुद्दा पुढे करून मातृशक्तीचा अपमान व अनादर करणार्या काँग्रेस पक्षाचा भाजपा महिला आघाडीकडून जाहीर निषेध करण्यात आला.
या आंदोलनात राज्य परिषद सदस्या डॉ. चंदा कोडवते, भाजप जिल्हा सचिव सौ. वर्षा शेडमाके, महिला आघाडी जिल्हा महामंत्री सौ. अर्चनाताई बोरकुटे, श्रीमती प्रतिभाताई चौधरी,जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मी कलंत्री,माजी नगरसेविका सौ. वैष्णवी नैताम, सौ. लता लाटकर, नीता उंदीरवाडे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्षा कविता उरकुडे, जिल्हा सचिव सौ. अर्चना चन्नावार, भाजपा महिला आघाडी शहराध्यक्षा सीमा कन्नमवार, महिला आघाडीच्या सौ. भूमिका बर्डे, गीता कुळमेथे, अर्चना निंबोळ, रश्मी बाणमारे, वर्षा कन्नाके, सुरेखा कंचर्लावार, भूषणा खेडेकर, भारती खोब्रागडे यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.