गडचिरोली:राज्यात महायुती सरकारने आपल्या मंत्रिमंडळातील काही भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांवर कारवाई करून भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आज शिवसेना उबाठा गटाचे नेत्यांनी केली आहे.या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार,जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्या नेतृत्वात शिवसेना कार्यालय, चामोर्शी रोड गडचिरोली येथून पैदल रॅली मध्ये भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करा अशी घोषणा देत इंदिरा गांधी चौकात राज्याच्या युती सरकारच्या विरोधात भ्रष्टाचारी मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून “जय भवानी जय शिवाजी” “उद्धव साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है” व भ्रष्टाचारी मंत्रांची हकालपट्टी करा अशा जोरदार घोषणा या वेळी करण्यात आल्या . याप्रसंगी गडचिरोली जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख विजय शृंगपवार, जिल्हा सल्लागार प्राध्यापक राजेंद्र लांजेकर, विधानसभा संघटक नंदू कुमरे, युवा सेना जिल्हा अधिकारी पवन गेडाम, तालुकाप्रमुख कुणाल कोवे, मुलचेरा तालुकाप्रमुख समीर मुखर्जी, तालुकाप्रमुख प्रफुल येरने, दादू रामगिरवार, तालुकाप्रमुख मनोज पोरटे, शहर प्रमुख पप्पू शेख, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मीताई मणे, मंगलाताई बीरमवार, भारती मडावी, माजी जिल्हा संघटिका हेमलता वाघाडे, चंदना बिष्नोई, तुळजा तलांडी, अश्विनी चौधरी, चेतन उरकुडे, प्रशिक झाडे, वैभव सातपुते, गणेश धोटे, बादल मडावी, भूषण पोरटे, अमित नंदा, सोहेल शेख, अतुल नैताम, नितीन निंबोडकर, संतोष जेंगटे, कृष्णा पदा, शुलख कावळे व अनेक शिवसैनिक कार्यकर्ते उपस्थित होते.