
गडचिरोली: गडचिरोली मुख्यालयापासून 9 किमी अंतरावर असलेल्या काटली गावात 7 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता रोडच्या बाजूला व्यायाम करीत बसलेल्या 6 तरुण मुलांना भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रक ने चिरडले होते.या घटनेत दोन मुलांचा घटनास्थळी व दोन मुलांचा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झालेला असून इतर दोन जखमी मुलांना हेलिकॉप्टर द्वारे पुढील उपचारासाठी नागपूर येथील किंग्सवे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.या घटनेच्या दिवशी शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी येऊन सर्व पीडित कुटुंबाची मदत करण्याची हमी दिली होती.
दिलेल्या वचनाचे पालन करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्व मृत आणि जखमी झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांना पाठवलेली आर्थिक मदत घेऊन गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख व माजी आमदार सहसराम कोरोटे,जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर यांना काटली गावात पाठविले होते.चारही मृत बालकांच्या आणि दोन जखमी बालकांच्या कुटुंबियांना उपचाराकरिता प्रभावी उपाययोजना व आर्थिक मदत दिल्याची माहिती संपर्कप्रमुख कोरोटे यांनी यावेळी दिली होती.
या वेळी काटली चे सरपंच अरुण उंदिरवाडे,पुण्यवान सोरते सरपंच साखरा,तुषार मडावी सरपंच कनेरी,
राजू उंदीरवाडे सरपंच गोगाव, यशवंत काळबांदे सरपंच राजगाटा, शिवाजी गावडे सरपंच देवापूर, रंजिता पेंदाम सरपंच मौशिखांब, कांता हलामी सरपंच राजोली, अरुण उंदीरवाडे , निवृता राऊत सरपंच पोरला,मनोज जिंगठे सरपंच इंदाळा, दशरथ चांदेकर सरपंच नवेगाव, आकाश निकोडे बोदली, तालुका प्रमुख गुणाजी बोरकुटे, प्रफुल कोसे, अर्चना गोंदोडे महिला जिल्हा प्रमुख, संतोष गोंदोडे यांच्या सह काटली गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते.