दिनांक.4/9/2022
गडचिरोली शहरात अल्पावधीत भिशी खेलवणारा आरोपी सोनू ठाकूर नावाच्या व्यक्तीने गडचिरोली शहरातील अनेक नागरिकांना भिशी च्या नावाने गुंतवणूक करायला लावून,करोडो रुपयांचा गंडा घातला होता.मागील दोन महिन्यापूर्वी सोनू ठाकूर हा शहरातून फरार झाला असल्याची माहिती मिळताच गडचिरोली शहरातील लोकांमध्ये मोठी खळबळ माजली होती.
सोनू ठाकूर विरूध्द तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर, लगेच उप विभागीय पोलिस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा सक्रिय करण्यात आली होती.चार दिवसांपूर्वी सोनू ठाकूर हा उत्तर प्रदेशातील नोएडा येथे असल्याची माहिती मिळाली असल्याने,गडचिरोली पोलिस पथकाने काल गडचिरोली शहरात त्याला आणून अटक केली होती.
आज आरोपी सोनू ठाकूर याला गडचिरोली न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून माननीय न्यायलयाने सोनू ठाकूर याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिस कोठडीत होणाऱ्या चौकशीत सोनू ठाकूर ने किती लोकांना चुना लावला आहे हे निश्चित होईलच…
सोनू ठाकूर याला अटक केल्याची बातमी प्रसिद्ध होताच,दहा बारा लोकांनी सोनू ठाकूर ने फसवणूक केली असल्याची तक्रार शहरातील काही लोकांनी पोलिसात केलेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पोलिस विभागाच्या सापळ्यात सोनू ठाकूर अडकल्याने, किती लोकं या फसवणुकीचे बळी पडले आहे याची माहिती जनते पुढे येणारच आहे.