दामरंचा येथील आविस चे ग्रामपंचायत सदस्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश चुकीचा..

0
157

 

आमदार साहेबाकडे समस्या घेवुन गेल्यावर आ.वि.स च्या कार्यकर्त्यांचा खोटा प्रवेश दाखवले..!!

 ग्रा.प.सदस्य श्री.सम्मा कुरसाम यांचे स्पष्टीकरण..!!

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत दामरंचा येथील आविस चे ग्रामपंचायत सदस्य  साम्मा पडगा कुरसाम आणि आविस चे कार्यकर्ते  ईरीया ईरपा कुळमेथे,  मासा पेंटा सिडाम, वसंत गणपत कुरसाम इत्यादींनी आदिवासी विद्यार्थी संघाला सोडून,अहेरी विधान सभा क्षेत्राचे आमदार   धर्मराव बाबा आत्राम  यांच्यावर विश्वास ठेउन,आमदार  बाबा आत्राम  यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दुपट्टा टाकून प्रवेश दाखवण्यात आले असून सर्व वर्तमानपत्र खोटी बातमी प्रकाशित करण्यात आली होती.

आपल्या अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांच्याकडे आमच्या समस्या घेउन गेलो होतो, त्यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना दुपट्टा टाकून प्रवेश दाखवले हे चुकीचे असून मी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेत्रुत्वात आदिवासी विध्यार्थी संघटने मध्येच आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.अशाप्रकारे दामरंचा ग्राम पंचायतचे सदस्य सम्मा कुरसाम यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची भेट घेवुन स्पष्ट केले आहे.आज त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या निवासस्थानी घडलेली आपबीती सांगितली असून मी संघटनेसाठीच कार्य करतो असे सांगितले आहे.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे,माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम,अहेरीचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,दामरंचाचे माजी सरपंच जिलकरशाह मडावी,इंदारामचे माजी सरपंच गुलाबराव सोयाम,आविसचे कार्यकर्ते प्रमोद कोडापे, विनोद दूनालावार,पोदा वेलादी,दशरू सिडाम,आलापलीचे माजी ग्राम पंचायत सदस्य सलीम शेख,नरेंद्र गरगाम,राकेश सड़मेक,इत्यादी उपस्थीत होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here