गडचिरोली:स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम / कार्यक्रम यांचे आयोजन विभागामार्फत करण्यात येत आहे. राज्यातील विविध प्रांतातील संस्कृतीचे आदान प्रदान, स्थानिक कलाकारांसाठी व्यासपीठ, लुप्त होत चालेल्या कला व संस्कृतीचे जनत व संवर्धन, तसेच स्वातंत्र्य लढयातील ज्ञात अज्ञात लढवाययांची माहिती इत्यादी बाबी जनसामान्यपर्यंत पोहचविण्याच्यासाठी दिनांक 16 फेब्रुवारी, 2024 ते दिनांक 20 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत जिल्हयात पाच दिवसीय “महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.