मार्कंडेय देवस्थान दुरुस्ती करीता भाविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आमदार डॉ देवराव होळी आपल्याच पक्षाच्या अडचणी वाढविणार काय….??

0
344

गडचिरोली: मागील आठ वर्षापासून प्रलंबित असलेला मार्कंडेय मंदिराचा जीर्णोद्धार आता भाजप चीच अडचण करायला लागला की काय असे काल भाविकांनी काढलेल्या मोरच्याला पाहून वाटू लागले आहे.
मार्कंडेय मंदिर तीन हजार वर्षापूर्वीचे असल्याने अशा मंदिराचे जीर्णोद्धार करण्याच्याचा अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय पुरातत्व खात्याकडे आहे,जिल्ह्यातील खासदार हा केंद्र सरकार चा प्रतिनिधी असल्यामुळे गडचिरोली विधानसभेच्या आमदारांनीच खासदार अशोक नेते यांच्या मागे फटाके लावण्याच्या उद्देशाने पडद्याच्या मागे राहून भाविकांच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आपली पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न केला असल्याचे शहरातील लावलेल्या बॅनर वरून दिसून आले होते.
गडचिरोली जिल्ह्यात आमदार डॉक्टर देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांच्यात फक्त एकमेकांवर कुरघोडी कशी करायची हेच प्रयत्न वारंवार केले जात आहे,पण कुरघोडी करतांना आमदार महोदयांनी आपल्याच पक्षाची इभ्रत चव्हाट्यावर आणून सोडल्याची परिस्थिती कालच्या भाविकांनी केलेल्या आंदोलनाला पाहता दिसून येत आहे. मंदिराच्या दुरुस्तीचे कार्य ताबडतोब सुरू कसे होईल याचे प्रयत्न करण्यापेक्षा आपल्याच पक्षाच्या खासदाराला कसे बदनाम करता येईल याची संधी शोधण्याचं आमदार आपला वेळ घालवत तर नसावे अशी शंका आता भाजप ला मतदान करणाऱ्या लोकांना नक्कीच वाटू लागले असेल यात मुळीच शंका नाही…
काल भाविकांच्या मोरच्याला सामोरे जाऊन खासदार अशोक नेते यांनी जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या उपस्थितीत मोरच्याचे नेतृत्व करणाऱ्या साधू संतांसमोर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून माहिती घेतली असता मंदिराच्या कामाची निविदा काढण्यात आली असून फक्त मजूर पुरवठा करण्याची निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली असून,ताबडतोब पंधरा दिवसाचे आत मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात सूचना खासदार महोदयांनी दिल्याने , आता पुढे होणारा आंदोलन हा भक्ती भावनेने यज्ञ करीत साखळी पद्धतीने सौम्य स्वरूपात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे व प्रशासनाला कामाची सुरवात कोणत्या तारखेपासून होईल याचे लिखित स्वरुपात आश्वासन पुढील पंधरा दिवसात देण्यात येईल अशी ग्वाही प्रशासनाच्या आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
मागील वर्षी आमदार होळी यांच्या कडून एका आदिवासी मतदाराला “तुझ्या एका मताने मी निवडून आलो काय” असे उद्गार आमदाराच्याच श्रीमुखात चपराक सारखे बसल्याने,आता आमदार होळींनी आपला बस्तान सुरक्षित करण्याच्या नादात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात सक्रिय होण्याचा प्रयत्न केला जात असल्याने येणाऱ्या काळात,विरोधी पक्षाला याचा किती फायदा होईल तसेच आमदार डॉक्टर देवराव होळी आणि खासदार अशोक नेते यांच्या चालू असलेली कुरघोडी भारतीय जनता पक्षाला कुठे नेवून ठेवणार हे परमेश्वराला च ठाऊक…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here