१ लाख ३० हजाराची लाच घेताना दोघांना अटक,मुख्य आरोपी गटविकास अधिकारी फरार..

0
896

 

अहेरी: तेंदुपानाची वाहतूक करण्याकरिता या ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी एका तेंदू ठेकेदाराकडून १ लाख ३० हजार रुपये ग्रामविकास अधिकारी यांनी लाच मागितली होती, सदर ठेकेदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने सदर ठेकेदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती .

दाखल केलेल्या तक्रारीची सहानिशा करून, आज अहेरी येथील प्रभारी गटविकास अधिकारी प्रतीक दिवाकर चन्नावार याच्यासह संजीव येल्ला कोठारी व अनिल बुधाजी गोवर्धन या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या तिन्ही आरोपी पैकी प्रतीक चन्नावार हा प्रभारी गट विकास अधिकारी असून संजीव येल्ला हा कंत्राटी समन्वयक व अनिल गोवर्धन हा खाजगी व्यक्ती आहे.सदर ची कारवाई होण्याची शक्यता असल्याचे दिसून येताच  गट विकास अधिकारी प्रतीक चन्नावार हा फरार झाला आहे.

लाच प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार तक्रारकर्त्या ठेकेदाराने अहेरी तालुक्यातील गोविंदगाव येथील युनिट खरेदी केला होता,या तेंदुपानाची वाहतूक करण्यासाठी पंचायत समितीच्या नाहरकत प्रमाणपत्राची गरज होती.सदर प्रमाणपत्र देण्यासाठी प्रतीक चन्नावार यांनी १लाख३० हजाराची लाचेची मागणी केली होती.

त्या नुसार लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खाजगी व्यक्ती अनिल गोवर्धन यांच्या माध्यमाने १लाख ३० हजाराची लाच घेतांना पंचा समक्ष रंगेहाथ पकडले.या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी गट विकास अधिकारी प्रतीक चन्नावार हा फरार झाला आहे.

लाच प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनात उप अधीक्षक अनिल लोखंडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली  लाच प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here