एस टी. बँकेच्या गैर कारभाराची चौकशी करण्याचे मुख्य मंत्र्यांचे आदेश…

0
464

 

दिनांक.१३ ऑगस्ट.

धुळे :- सँलरी ऑनर्स को. आँप बँकींग क्षेत्रात ,आशिया खंडात अग्रेसर ठरलेल्या , राज्य स्तरीय एस. टी को आँप बँकेत , सहकार खात्याचे आणि रिझर्व्ह बँकेचे निर्दैश धुडकावून मन मानी पद्धतीने , नव निर्वाचित सदस्यांनी कामकाज सुरू केल्याने बँकेचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या तक्रारी वरुन मुख्यमंत्री ना. एकनाथ शिन्दे यांनी या संदर्भात शहानिशा करुन , त्वरित अहवाल सादर करण्याचा आदेश राज्याच्या सहकार निबंधकांना दिला असल्याची माहिती बंँकेचे माजी संचालक महेश घुगे यांनी दिली आहे.

अँड. गुणरत्न सरोदे, यांच्या नेत्रुत्वाखाली निवडून आलेल्या संचालक मंडळांने , एस टी को आँप बँकेची घटना बासनात गुंडाळून, सहकार खात्याचे व रिजर्व बँकेचे निर्देश धुडकवून मनमानी पद्धतीने काम काज सुरू केल्याने ,बँकेचे अस्तित्व धोक्यात आल्याची तक्रार एस टी को आँप बँक कर्मचारी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ आणि  बँकेचे माजी संचालक महेश घुगे यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे केली होती.

या तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकार आयुक्तांना व निबंधकाना सखोल चौकशी करुन, वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचा आदेश पारित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here