विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नागरी सत्कार समारंभ संपन्न… महाविकास आघाडीचे अनेक नेते अनुपस्थित…

0
294

आघाडीत बीघाडी होण्याची कारणे शोधणार काय वडेट्टीवार…

गडचिरोली.१३ ऑगस्ट: गडचिरोली चे भूमिपुत्र विजय वडेट्टीवार यांचे प्रथम नगरागमन निमित्त जाहीर सत्कार महविकास आघाडीच्या वतीने आज इंदिरा गांधी चौकातील राजीव गांधी भवनात आयोजित करण्यात आले.

या सत्कार सोहळ्यापूर्वी गडचिरोली शहरातून भव्य दिव्य रॅली काढण्यात आली होती,या रॅलीत हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती,शहरातील इंदिरा गांधी चौकात क्रेन आणि जेसीबी च्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली होती.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे नागरी सत्कार सोहळ्यात महविकास आघाडी चे एक प्रकारे मोठे शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली असून,भविष्यात येणाऱ्या काळात आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही याची दक्षता विजय वडेट्टीवार यांना घ्यावी लागणार असल्याचे दृश्य या कार्यक्रमात दिसून येत होते.महाविकास आघाडीत सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे मुख्य नेते या कार्यक्रमात दिसून आले नाही या वरून काहीतरी आलबेल चालू असल्याची कुजबुज कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती.

या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अनेक समस्यांना सोडविण्याची विनंती आपल्या भाषणातून वडेट्टीवार यांना केली.

 

गडचिरोली जिल्ह्यातील सीरोंचा तालुक्यातल्या मेडीगट्टा धरणं ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी,ओबीसी आरक्षण लागू करण्याची मागणी सरकार समोर लाऊन धरणार असल्याची,प्रत्येक आदिवासी कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी,नौकर भरतीत बेरोजगार युवकांना सामावून घेण्याची गरज,येणाऱ्या काळात निवडणूक आयोग स्थापन करण्यासाठी जाहीर केलेल्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार काढल्याचे अध्यादेश केंद्र सरकारच्या वतीने काढण्यात आल्याने केंद्र सरकारचा निषेध करण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

या कार्यक्रमात मंचावर सत्कारमूर्ती विजय वडेट्टीवार,आमदार सुधाकर अडबाले, आमदार अभिजीत वंजारी, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे महासचिव डॉक्टर नामदेव किरसान, काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,काँग्रेस महिला आघाडी च्या जिल्हाध्यक्ष ऍड.कविता मोहरकर,माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी,माजी खासदार मारोतराव कोवासे, रवींद्र दरेकर,शिवसेनेचे नेते माजी आमदार डॉ रामकृष्ण मडावी,माजी आमदार आनंदराव गेडाम,सुरेंद्र चंदेल,छायाताई कुंभारे,वासुदेव सेडमाके, अरविंद कात्रटवार,युवा काँग्रेस नेत्या शिवानी वडेट्टीवार, अतूल मल्लेल्वार,कुणाल पेंदोरकर,पंकज गुड्डेवार,माजी जीप अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार,काँग्रेस डॉक्टर आघाडीचे अध्यक्ष डॉ.हेमंत आप्पलवार,माजी नगराध्यक्ष राम मेश्राम,समशेर पठाण, आविस नेते अजय कंकडालवार सुरेश पोरड्डीवार,डॉ.नितीन कोडवते,डॉ. चंदाताई कोडवते भावना वानखेडे, यांच्या सह महविकास आघाडीचे हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here