Gadchiroli district highlights…
गडचिरोली.१७ मे.
सध्या भारतात सर्वात जास्त चर्चेत असलेला पिक्चर “द केरला स्टोरी” चा एक शो विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने आज गडचिरोली शहरातील अलंकार टॉकीज मध्ये महिला व मुलींना मोफत दाखविण्यात आला आहे.
विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने अलंकार टॉकीज या ठिकाणी “द केरला स्टोरी” पिक्चर बघायला आव्हाहन केल्यानंतर नागरिकांनी मोठा प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येने गर्दी केली होती.टॉकीज मध्ये खुर्चीची मर्यादित संख्या ३२५ इतकी असताना सुध्दा,लोकांच्या वाढता प्रतिसाद पाहून ऐनवेळी काही खुर्च्या आणावे लागल्या तर आखरी वेळेस दरीवर बसून सुध्दा आज लोकांनी पिक्चर बघण्याचा आनंद घेतला होता.
“द केरला स्टोरी” पिक्चर मोफत दाखविण्याचा उद्देश असा आहे की भारतातील अनेक ठिकाणी नाबालिक मुलींना व युवतींना फुस लावून गैरप्रांतीय युवकांनी लव जेहाद च्या नावाने कसा अत्याचार केला होता याची कल्पना जास्तीतीत जास्त लोकांना व्हावी यासाठी हा पिक्चर आज मोफत दाखविण्यात आला होता.
अलंकार टॉकीज मध्ये बसण्याची मर्यादा संपल्यानंतर अनेकांचा हिरमोड होऊन आल्यापावली परत जावे लागले होते हे विशेष…
या वेळेस शहरातील लोकांना पिक्चर पाहण्यासाठी योग्य ती व्यवस्था व्हावी यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले होते.