एके काळी भारतात सोन्याचा धुर निघत असायचा असे म्हटले जाते. त्यात तथ्यही आहे. मातीतून सर्वच पिकतं त्याला सोनं ही अपवाद नाही.
भारत हा कृषिप्रधान देश होता ,आजही आहे आणि पूढेही रहाणार. यात दुमत असायच कारण नाही कारण देशाचा पारंपारिक, मुलभूत ऊद्योग शेतीच आहे. या देशाची जी सर्वागिण प्रगती झाली ,त्याला कारणीभूत शेतीच आहे. अत्याधुनिक जगाच्या यांत्रिकी करणाचं उगम स्थान शेतीच आहे.
अस असतांही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे , मुळातला श्रीमंत शेतकरी भिकारी झाला आहे.प्रामाणिक पणे कर्ज फेडणारा शेतकरी टांगणीवर लागला आहे. पन्नास हजाराची आंस धरुन बसला आहे..आणि गैर मार्गाने कमावलेल्या पैशातून, शेती घेणारा समाजद्रोही अजिर्ण झाल्याचा ढेकर देत आहे. स्वार्थांध सरकारच्या मतलबी आश्वासनांच्या आशेवर देशातला शेतकरी जगण्याचा प्रतत्न करित आहे. सरकारच्या अनुदानावर शेतकरी अवलंबून आहे. शेतकऱ्याला मतलबी सरकारी धोरणांनी व बेताल निसर्गाने अपंग केले आहे.
भरिसभर , राजकीय स्वार्थापायी कष्टकरी शेत मजुराला, कारागिराला मोफत धान्य देऊन शासनाने आळशी बनवल आहे. सर्व च फुकट मिळू लागल्याने , श्रम करण्याची दाणतच राहिली नाही. परिणिमतः पैसै देवूनही शेत मजुर मिळेनासा झाला आहे.
राहता राहिला भिकाऱ्यांचा प्रश्न,जिद्दी ,स्वभिमानी, परिस्थिती ची जाणीव असणारे अंध, अपंग , इच्छाशक्तीच्या बळावर आवशयक ते प्रशिक्षण घेऊन शक्य असेल ते काबाड कष्ट करून, स्वाभिमानी जीवन जगण्याचा प्रयत्न करित असतात. , तर दुसरीकडे धडधाकड , कामचुकार तरुण भिक मागतांना दिसतात. . ही विषमतेची दरी शासनाच्या चुकीच्या धोरणाने वाढत चालली आहे..हे असेच चालत राहिले तर कालातंराने देश रसातळाला गेल्याशिवाय रहाणार नाही. तेव्हा पीडित भारतीयांना शेजारी पाजारीही आसरा देणार नाहीत. आणि देशातले बदमाश या पिडीतांना समाधानाने जगु देणार नाहीत.