घरकुल साठी मोफत मिळणाऱ्या रेती साठी सरपंच करतोय अटकाव…

0
793

Gadchiroli district highlights..

चामोर्शी.14/3/2023

शासनाच्या वतीने उदार धोरण अंमलात आणण्यासाठी प्रयत्नशील प्रशासनाच्या कामाला गावातील सरपंच जर विरोध करीत असेल तर त्या गावातील लोकांना किती अडचणींना तोंड द्यावे लागत आहे याचा विचार न केलेलाच बरा…

असाच एक उदाहरण चामोर्शि तालुक्यातील गणपुर आणि मुधोली येथे पाहायला मिळत आहे.घरकुलाच्या बांधकामाकरीता शासनाने 5 ब्रास रेती झिरो रॉयल्टी मध्ये देण्याचा नियम असताना सुध्दा सोमनपल्ली येथील सरपंच नीलकंठ निखारे यांनी आपल्या जवळच्या काही गुंड प्रवृती च्या लोकांना हाताशी धरून घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती नेण्यास अटकाव करीत असल्याची तक्रार येनापुर वासियांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केली आहे.

सदर तक्रारीत सरपंच निखारे हे सोमणपल्ली गांवचे सरपंच असून ही आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेरील गणपुर आणि मुढोली येथील घरकुल लाभार्थ्यांना रेती नेण्यास अटकाव करून,तुम्हाला रेती पाहिजे असल्यास माझ्याच ट्रॅक्टर ने पैसे देऊन न्यावी लागेल अशी दमदाटी करून लोकांना धमकावित असल्याची माहिती येणापुर गावातील काही नागरिकांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितली होती.

जवळच्या गावातील सरपंच धमकवित असल्याची माहिती चामोर्षि तहसीलदार संजय नागटिळक यांना सुध्दा देण्यात आली असून,या दादागिरी करणाऱ्या सरपंच विरूध्द कोणतीही कारवाई तहसील कार्यालयातून करण्यात आली नाही,यावरून प्रस्तावित केलेला रेती घाट सोडून इतर घाटावरून रेती उत्खनन करण्यास तहसीलदारांचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे विदारक वास्तव चित्र चामोर्शि तालुक्यात दिसून आले आहे.

मागील दोन वर्षापूर्वी सरपंच नीलकंठ निखारे विरूध्द अवैध वाळू वाहतूक संबधी गुन्हा दाखल करण्यात आले होते,तरीही काही भ्रष्टाचारी लोकांच्या मदतीने वर्षभर अवैध रेती उत्खनन करीत असल्याची माहिती या लोकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

अशा प्रकारे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती नेण्यास अटकाव करणाऱ्या सरपंच विरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती येणापुर वासियांनि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here