करोडोच्या धान्य घोटाळ्यात सहभागी नगरसेवक पोलिसांच्या आशीर्वादाने फिरतोय मोकाट…

0
736

Gadchiroli district highlights.26/2/2023

राजकीय नेते मंडळींचा नगरसेवकांना आशीर्वाद…

धानोरा.(मुरुमगांव)

एखाद्या सरकारी विभागात होत असलेला करोडो रुपयांचा अपहार उघड झाल्यानंतर जर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनीच डोळेझाक करून झालेल्या आर्थिक घबाड दाबण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवायचा तरी कसा…याचा मोठा उदाहरण म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील धान खरेदी करणारे महामंडळ आणि आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मार्फत होणारी धान खरेदी करणारी केंद्रे..

एकीकडे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी धान खरेदीवर अनुदान देण्याची व्यवस्था करतो आणि दुसरी कडे धान खरेदी केंद्राची जबाबदारी सांभाळणारे अधिकारीच जर करोडो रुपयांचा धान्य चोरीच्या मार्गाने विकणार असेल तर शासनाने या चोरांवर कठोर कारवाई करून,शेतकऱ्यांना न्याय देणारी भूमिका घेतली पाहिजे, जेणेकरून येणाऱ्या काळात पुन्हा कुठल्याही धान खरेदी केंद्रावर आर्थिक घबाड होणार नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भाग असलेल्या धानोरा तालुक्यातील मुरूमगाव च्या विविध कार्यकारी संस्थेत 1 कोटी 91लाख 65 हजार 163 रुपयांचा आर्थिक घोटाळा प्रकरणात, त्या धान्याची मूळ किंमत पेक्षा दीडपट रक्कम म्हणजे 3कोटी 2लाख 56 हजार रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची तक्रार 30/8/2022 रोजी प्रादेशिक व्यवस्थापक यांच्या आदेशानुसार धानोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या तक्रारीत संस्था सचिव एल जी धारणे,केंद्र प्रमुख गुरुदेव धारणे,संचालक शंकर कुमरे,विपणन निरीक्षक आर एन कोकोडे यांच्या सह अज्ञात व्यापारी आणि मुरूमगांव आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या संपूर्ण  संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिसांना या प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर या आर्थिक घोटाळा घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांना धानोरा पोलिसांनीच वाचविल्याचा लाजिरवाणा प्रकार धानोरा तालुक्यातील लोकांना पाहायला मिळत आहे.याप्रकरणात संस्थेच्या काही लोकांवर कारवाई करण्यात आली असून या घबाडात मुख्य भूमिका निभावणारे एक नगरसेवकांसह तीन व्यापारी मोकाट फिरत असताना दिसून आले होते.

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर फरार आरोपींना पकडण्याऐवजी त्यांना जमानत कशी मिळवून देता येईल अशी व्यवस्था धानोरा पोलिसांनी केली असल्याची चर्चा धानोरा व्यापार नगरीत सुरू झाली आहे.

या आर्थिक घोटाळ्यात फरार असलेल्या आरोपींचे नाव संजीव सुभाष कुंडू, मिंटू अभिमन्यू दत्ता,हिरेन हेमंत हलदर असे असून, संजीव सुभाष कुंडू, हा धानोरा नगर पंचायतीचा विद्यमान नगर सेवक आहे.बऱ्याच प्रकारचे अवैध धंदे चालविणाऱ्या या व्यापाऱ्यांनी धानोरा पोलिसांनाच लाखोंची चीरमिरी देऊन जमानत मिळवून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

करोडोच्या घरात झालेल्या आर्थिक घबाडाची खरी चौकशी पोलिसानं मार्फत होईल काय असा प्रश्नही निर्माण होत आहे.या घोटाळ्याची चौकशी सी आय डी मार्फत करून दोषी अधिकाऱ्यांवर आणि व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेतून होतांना दिसत आहे.

या प्रकरणात महाराष्ट्र माझा न्यूज च्या वतीने दोषी आणि फरार असलेल्या आरोपींची नावे विचारली असता, धानोरा पोलिस उप विभागीय अधिकारी,आणि तपास करीत असलेल्या अधिकाऱ्यांनी,आज देतो,उद्या देतो अशी भूलथापा देऊन या प्रकरणात कोणती कारवाई करण्यात आली याची माहिती चार दिवसांच्या कालावधीत सुध्दा मिळाली नाही यावरून धानोरा पोलिसांवर शंका निर्माण झालेली आहे.या घोटाळ्यात दोषी असलेला नगरसेवक खुलेआम फिरताना दिसत असून त्याचा मोबाईल नंबर सुध्दा नियमित चालू आहे ही विशेष बाब आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here