Gadchiroli district highlights..21/2/2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे इयत्ता १२ वी ची परिक्षा दिनांक २१/०२/२०२३ ते २१/०३/२०२३ व इयत्ता १० वी ची परिक्षा ०२/०३/२०२३ ते २५/०३/२०२३ रोजी घेण्यात येणार असल्याने या परिक्षांच्या कालावधीत परिक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पुर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. सदरची परिक्षा ही कॉपीमुक्त व्हावी व परिक्षेमध्ये पारदर्शकता यावी यासाठी शिक्षण विभागासोबत गडचिरोली पोलीस दल या परिक्षा प्रक्रीयमध्ये सहभागी झालेले आहे. या अनुषंगाने गडचिरोली जिल्हयात आज पासुन सुरु झालेल्या १२ वी चे परिक्षा केंद्र असलेले श्रीमती. सिंधूताई पोरेड्डीवार कनिष्ठ महाविद्यालय, गोगाव जि. गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज दिनांक २१/०२/२०२३ रोजी भेट दिली.
सदर महाविद्यालयात भेट दिल्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी विविध वर्गावर जाऊन १२ वी च्या परिक्षेसाठी बसलेल्या सर्व परिक्षार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच परिक्षा केंद्र प्रमुख सौ. विजया राजेंद्र मने मॅडम यांना परिक्षार्थी आपसांत बोलणार नाहीत, कुणीही कॉपी व गैरप्रकार करणार नाहीत, इलेक्टॉनिक साधनांचा उपयोग करणार नाहीत इ. प्रकारच्या सुचना दिल्या. तसेच परिक्षा केंद्रावर बंदोबस्तासाठी तैनातीस असेलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चोख बंदोबस्त व परिक्षा ही कॉपीमुक्त होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना दिल्या.