Dhule district highlights.24/11/2022
“नागरी हक्क संरक्षण समिती ” ही सेवाभावी सामाजिक संघटना आहे. या संघटनेत विविध क्षेत्रातील, विविध विभागातील, निःस्वार्थ, निःस्प्रुह, योगदान देणारे बुजुर्ग, अनुभवी, अभ्यासक,डॉक्टर ,वकील, प्राद्यापक, अभियंते, विविध विभागातील निव्रुत्त अधिकारी ,ऊद्योजक, व्यापारी, , पत्रकार, कामगार नेते आदी विना मोबदला , स्वयंप्रेरणेने योगदान देणारे सेवाभावी कार्यकर्ते आहेत.
नागरिकांच्या ज्वलंत समस्या ऊजागर करणे, त्या समस्यांशी सबंधित विभाग प्रमुखांना त्या समस्या अवगत करणे, त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी , सबंधित विभाग प्रमुखांसोबत समन्वयक बैठका घेणे, आणि सबधितांनी समस्या सोडवणुकीसबंधी दिलेल्या आश्वासनांचा पाठपुरावा करणे आणि त्यासाठी, जनप्रबोधन, जन जाग्रुती करणे हे संघटनेचे ध्येय आहे .
शासनाने जन कल्यणार्थ घेतलेल्या धोरणात्मक निर्णय याची अमंल बजावणी करण्यास सबधित यंत्रणेला प्रव्रूत करणे ,गरजवंताला त्या कल्याणकारी यौजनांचा लाभ खसा होईल यासाठी पाठपुरावा करणे हा सुद्धा नागरी हक्क संरक्षण समितिचा हेतू आहे.
हे करतांना होणारा मन्ःस्ताप , खर्ची होणारा वेळ , पैसा, येणारा वाईटपणा, प्रसंगी जाणीवपूर्वक निर्माण केला जाणारा गैरप्रचार, या नकारात्मक बाबी सोडल्या तर, या जन हितार्थ राबविल्या.जात असलेल्या चळवळीला सर्वसामान्यांचा, सबंधित विभाग प्रमुखांचा मिळणारा प्रतिसाद, या सकारात्मक बाबीही तितक्याच महत्वाच्या ठरतात.
धुळे शहर आणि धुळे जिल्ह्यातील
नागरिक खुपच सहनशिल आहेत, नागरीकांच्या सहनशिलतेच पारितोषिक द्यायचे झाल्यास ,ते धुळे शहरातील व धुळे जिल्हातील नागरिकांनाच द्यावे लागेल.
सहनशिलता ही चांगली बाब असली तरी अन्याय सहनकरणे ही बाब चांगली नाही.कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास , “अन्याय करणार्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो “, कित्येक वर्षा पासुन धुळ्यातील सहनशिल नागरीक मुकाट्याने अन्याय सहन करित आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक गैरसोयिंना सामोरे जावे लागत आहे. परिणामतः धुळेकरांचे मानसिक आणि शारिरिक आरोग्य धोक्यात आले आहे.
आम्ही शासनाला, सबंधित सर्व यंत्रणाना, नगर पालीका, महानगर पालीका आदींना सर्व प्रकारचा कर भरतो,, परंतु त्या बदल्यात आपल्याला पुरेसा मोबदला मिळत नाही, हे कटु सत्य आहे. ऊलट आपलीच गैरसोय होत आसते. . “चोर कोतवाल को डाटे” अशी आपली अशी अवस्था झाली आहे.
हे सर्व लक्षात घेऊन जनजाग्रुती, आणि जन आंदोलनाचा वसा आम्ही नागरी संरक्षण समिति, द्वारा घेतला आहे. ” बाप दाखव नाही तर श्राद्ध कर” ही आमची भूमिका आहे.
याचाच एक भाग म्हणून आम्ही कित्येक वर्षा पासून प्रलंबित , “मनमाड धुळे इंदोर , रेल्वे” च्या समस्येला स्पर्श केला आणि जनतेतला असंतोष ऊफाळून आला.
आम्ही रेल्वे यंत्रणेकडे या मार्गाच्या अद्यावत कामाची
विचारणा केली, त्यांनी माहिती देण्यास असमर्थता दाखवित , जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टकडे
अंगुली निर्देश केला.
आम्ही जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट कडे माहीती देण्याबाबत विचारणा केली. त्यांनी सरळ हात वर करित, या प्रकल्पाशी आपला काहीच सबंध नसल्याचे आम्हाला लेखी कळविले. त्या मुळे नाईलाजाने आम्हाला जिल्हाधिकार्याचे दार ठोठवावे लागले. त्यासाठी जनजागृती करावी लागली. त्यासाठी समाज माध्यमाच हत्यार ऊपसाव लागल. स्वतंत्र ग्रूप तयार करावा लागला.
सबंधित खासदार महोदयांना विद्यमान मंत्रालययाकडे जाऊन व बसून त्यांचा दि.03/01/2022 रोजी त्यांनी रेल्वे मंत्री महोदयांना दिलेल्या पत्राचा उत्तर लिहून घ्यावे लागले, त्याचा व्हिडीओ तयार करवून घ्यावा लागला. त्यासाठी खासदार साहेबांना पंधरा दिवस प्रतिक्षा करावी लागली. 15 नोव्हेंबर 2022 रोजी रेल्वे मंत्र्याचे पत्र हाती घेतल्या नंतर मोठी पत्रपरिषद घेऊन , त्यात रेल्वे मंत्र्याच्या त्या पत्राचा आणि सबधित व्हिडीओ
चा हवाला देत “मनमाड धुळे इंदोर रेल्वे मार्ग ” होणारच, बोरविहीर नरडाणा हा त्याचात भाग असल्याचे सांगावे लागले.
अर्थात, खासदार महोदयांनी, हे सांगण्याचा आटापीटा केला तरी नागरिक मात्र शासकीय खुलाशावर अडून होते. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून लेखी आल्याशिवाय, आमचा विश्वास बसणार नाही अशी ठाम भूमिका नागरी हक्क संरक्षण समितीद्वारे
घेण्यात आली होती. परिणामतःत्याच दिवशी , त्याच वेळी ऊप जिल्हाधिकारी श्री. महेश जमदाडे यांचे आणि रेल्वे मंत्रालयाचे लेखी पत्र प्राप्त झाले.आणि हा गुंता सुटला.
नागरी हक्क संरक्षण समितीने हा प्रश्न ऊजागर केल्याने. या प्रकल्पाला ला चालना मिळाल्याचे द्रुष्य स्वरूपात स्पष्ट झाले.गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचे व त्या प्रकल्पाच्या कामाला चालना देण्याचा, नागरी हक्क संरक्षण समितिचा हेतू साध्य झाल्याने, नागरी हक्क संरक्षण समितीने येथे तूर्त थांबण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कारणपरत्वे कामात खंड पडल्यास समितीला पुन्हा चळवळीचे हत्यार ऊपसावे लागेल याची सबधितांनी नोंद घ्यावी असा ईशाराही समिती देत आहे.
मनमाड धुळै इंदोर रेल्व मार्ग हा जिव्हाळ्याचा प्रकल्प पूर्ण होण्या बाबतची शांसकता लक्षात घेता , हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार होई पंर्यत , या प्रकल्पाच्या पाठपुरव्याची धग तेवत रहावी म्हणून , मनमाड ते इंदोर दरम्यान , नागरी भागातील प्रत्येक दुकान, घर, आस्थापनां, विविध प्रकारची वाहने, आदिंच्या पार्श्वभागावर, प्रत्येक जागरूक नागरिक व स्वयं सेवी संघटनेने पुढाकार घेऊन ” आमच्या हयातीतच
“मनमाड धुळे इंदोर रेल्वे प्रकल्प पूर्ण व्हायलाच हवा”, अशा आशयाचे स्टीकर्स लावुन हा प्रश्न तेवत ठेवावा अशी जाग्रुत नागरिकांना व स्वयं सेवी संघटनांना , नागरी हक्क संरक्षण समितीची विनंती आहे.
हिरालाल ओसवाल
अध्यक्ष,
महेशबाबा घुगे
सरचिटणीस,
जयेश बाफना
समन्वयक.