Gadchiroli district highlights 23/11/2022
दिनांक 21/11/2022 रोजी गडचिरोली जिल्हा परिषद मध्ये वित्त अधिकाऱ्याला एका महिला कर्मचाऱ्याचे विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती.
सदर प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पिडीत महिलेची बाजू लावून धरल्यामुळे पोलिसांनी उशिरा का होईना आठ तासानंतर दोषी वित्त अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले होते, परंतु गुन्हा दाखल करायला आठ तास उशिरा केल्यानंतर सुद्धा,स्थानिक पोलिसांनी आरोपीला दोन तासात अटक केली असल्याचा देखावा पोलिसांनी केला असून, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षक आणि जिल्हा परिषद मुख्य अधिकारी यांची भूमिका महत्वाची होती हे सुध्दा तितकेच खरे आहे…
सोमवारी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याचे विरूध्द अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून काल आरोपीला माननीय न्यायलयाने दिनांक 24/11/2022, पर्यंत दोन दिवसाची पोलिस कोठडी(police custody) सुनावली आहे.
पुढील तपास पोलिस उप विभागीय अधिकारी(sub divisional officers) प्रनील गिल्डा स्वतः करीत आहेत.