Gadchiroli district highlights.
धक्कादायक घटना…
Date.21/11/2022
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वित्त विभागाच्या वित्त अधिकाऱ्याने आपल्याच विभागातील एका 42 वर्षीय महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली.
सदर घटनेची तक्रार पीडित महिलेने सकाळी 11 वाजता पोलिस ठाण्यात केल्यानंतर सुद्धा गडचिरोली पोलिसांनी मुद्दामपणे वेळ काढूपणा दाखवीत पीडित महिलेला ताटकळत ठेवले होते.
पीडित महिलेच्या तक्रारीवर कारवाई होत नसल्याची माहिती शिवसेनेच्या महिला नेत्या छायाताई कुंभारे यांना कळताच, त्यांनी लगेच आपल्या महिला कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
झालेल्या घटनेची सविस्तर माहिती घेऊन ताबडतोब दोषी वित्त अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी छायाताई कुंभारे यांनी पोलिसांना केली होती, परंतु गेंड्याची कातडी पांघरून असलेले पोलीस अधिकारी मुद्दामपणे पीडित महिलेला न्याय देण्यासाठी इच्छुक नसल्याचे बघून छायाताई कुंभारे यांनी लगेच पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी यांच्याकडे जाऊन झालेल्या प्रकरणाची गंभीरता लक्षात आणून दिली होती, त्यावरून लगेच पोलिस अधीक्षक नीलोत्पल बासू यांच्या निर्देशानुसार पळून गेलेल्या आरोपी ला सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
आरोपी वित्त अधिकारी ग्रामीण भागातील परिसरात फिरत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती त्यावरून पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार तीन-चार पथके निर्माण करून आरोपीचा शोध घेण्यात आला होता.अखेर आपल्या राहत्या घरात लपून असलेल्या या वित्त अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.
एका पिडीत महिलेचा त्यांच्याच वरिष्ठ अधिकाऱ्याने विजयभंग केल्याच्या घटनेला पोलिसांनी गंभीरतेने न घेतल्याने तसेच सदर आरोपी फरार झालेला असल्याचे बघून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा राग अनावर झालेला होता.सदर आरोपी फरार झालेला असल्याचे बघून शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांचा राग अनावर झाल्याची विदारक परिस्थिती आज पाहायला मिळाली होती.
आज विनयभंगाच्या तक्रारीवर दुर्लक्ष करण्यात आल्यानंतर आता गडचिरोली पोलीस ठाण्यातील कार्यप्रणालीवर आता मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पीडित महिलेच्या बाजूने उभे राहून शिवसेनेच्या महिला नेत्यांनी, आज दोषी आरोपीला बेड्या ठोकण्यास पोलीस विभागाला अखेर भाग पाडले होते हे विशेष.
दोषी आरोपीच्या विरूध्द पिडीत महिलेची तक्रार दाखल करून घेण्यास नकार देणाऱ्या अधिकारी विरूध्द कठोर कारवाई करण्याची मागणी छायाताई कुंभारे यांनी केली आहे.