भू संपादन होऊन रेल्वेचे काम कधी सुरू होणार….???
इंग्रज अजून काही दिवस राहिले असते तर…. गडचिरोलीला रेल्वे केव्हाच येऊन आतापर्यंत खूप सारा विस्तार आणि विकास झाला असता. इंग्रजानी खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतात रेल्वेचं जाळं विणलं. गडचिरोलीला पण रेल्वे येता येता राहून गेली. काम सुरू होण्याच्या आधीच इंग्रजांना भारतातून जावं लागलं. गडचिरोलीच्या दृष्टीने हे एक प्रकारे वाईटच झालं म्हणायचं!
26 आगस्ट 1982 रोजी जिल्हा अस्तित्वात आल्यावर जिल्ह्याची थोडीफार प्रगती व्हायला लागली. शासनाचं लक्ष्य जिल्ह्याकडे गेलं. लोकप्रतिनिधी विकासासाठी प्रयत्न करू लागले आणि त्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यासाठी रेल्वे मंजूर झाली. आता या गोष्टीला अंदाजे विसेक वर्षे झाली असावी. राज्य आणि केंद्र सरकार रेल्वेसाठी लागणारा निधी उपलब्ध करून देणार आहे. दरवर्षी बजेट वाढत आहे पण अजुनही कामाला सुरवात झालेली नाही.
भू संपदनाचा तिढा अजुनही सुटत नाहीये…..
सरकारने वेळोवेळी सुचना देऊनही भुसंपादन करण्याच्या कामाला वेग आलेला नाही. त्यातच वन खात्याची मंजुरी हाही भाग महत्वाचा आहे. केंद्रात आणि राज्यात एकच सरकार असल्याने शिघ्रगतीने निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात व्हायला हवी पण…. घोडं कुठं अडत आहे माहीत नाही!
उपमुख्यमंत्री फडणवीस विदर्भाचे आहेत…. शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली ज़िल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत…. त्यामुळे त्यांनी स्वतःहून जातीने लक्ष्य दिल्यास कामाला निश्चित वेग येऊ शकतो हे निर्विवाद आहे. लोकप्रतिनिधी आणि जनतेने सुद्धा रेल्वेचं काम तातडीने सुरू व्हावं म्हणून सतत पाठपुरावा केला पाहिजे.
जी. श्रीनिवास….
गडचिरोली.