Gadchiroli.date.27/9/2022
Gadchiroli.date.28/9/2022
राजकारणी लोकांना आपल्या प्रसिध्दी साठी,आणि आपल्या वरिष्ठांना खुश करण्यासाठी नेहमीच जाहिरात करण्याची हौस असतेच याय काही मतभेद नाही…
परंतु जाहिरात फलक लावताना एखाद्या रस्त्याच्या वाहतुकीचा ताण , किंवा बाजूला लागून असलेल्या विद्युत प्रवाह वाहत असलेल्या वीज खांबाला दुर्लक्षित करणे म्हणजे होर्डिंग्ज,बॅनर लावताना एखाद्या निष्पाप माणसाच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जावी असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
निष्काळजीपणाचा एक उत्तम नमुना गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकातील खासदार अशोक नेते यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शुभेच्छा देणारा जाहिरात फलक दिसून येतो आहे.
सदर जाहिरात फलक लावताना अगदी चार पाच फुटावरती असलेला बी एस एन ल च्या पावर हाऊस युनिट कडे दुर्लक्ष करण्यात आले असून,अगदी बी एस एन ल च्या सुरक्षा भिंतीवरच्या सलाखीला धरुनच लावलेलाअसून, आणि चंद्रपूर रोड वर तर गच्च एका विद्युत खांबाला बांधून असलेला दिसत आहे.
अशा प्रकारे उच्च दाबाच्या वीज खांबाला अगदी जवळ होर्डिंग्ज लावल्याने एखाद्या मजूर माणसाचा जीव धोक्यात येऊ नये याची खबरदारी खासदार साहेबांनी घेतली पाहिजे.
शहरात लागलेले जाहिरात फलक बघून , नगर पालिकेच्या वतीने मंजुरी देण्यात आली असेल असे वाटत नाही,नियमानुसार परवानगी नसल्याने,नगर पालिकेच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार कोण राहणार याची तपासणी जिल्हा प्रशासनाने तातडीने सुरू करावी अशी मागणी काही जाणकार लोकांनी केली आहे.