पंदीलवार कुटुंबात महालक्ष्मी स्थापना आणि पूजा संपन्न….. …

0
159

गडचिरोली.दिनांक.4/9/2022

चामोर्शि तालुक्यातील आष्टी येथील सामाजिक कार्यात नेहमी अग्रसर राहणाऱ्या संजय पंदीलवार यांच्या घरी काल महालक्ष्मी मातेची स्थापना करून,यथावत पूजन करण्यात आले आहे.

निरंतर तीस वर्षांपासून पंदीलवार कुटुंबात महालक्ष्मी मातेची स्थापना करण्यात येत असून,महालक्ष्मी मातेची स्थापने प्रित्यर्थ समस्त जनतेस पंदीलवार परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा संदेश पाठविण्यात आले आहे.

संजय पंदीलवार यांच्या सौभाग्यवती रुपाली ताई पंदीलवार ह्या महिला काँग्रेस कमिटी च्या जिल्हाध्यक्ष असून सामाजिक,आणि राजकीय पक्षांच्या कार्यात नेहमी अग्रसर राहत असून,पंदीलवार कुटुंबाने कोरोणा काळात अनेक कुटुंबांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करीत असल्याचे दिसून आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here