काँग्रेस महिला अध्यक्षा रुपालीताई पंदीलवार यांनी दिला राजीनामा…

0
353

Gadchiroli district highlights.7/2/2023
गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महविकास आघाडीच्या सरकार च्या कार्यकाळात हळूहळू बळकटी प्राप्त होत असतांनाही काँग्रेस पक्षाच्या अडचणी वेळोवेळी वाढत असल्याची परिस्थीती दिसून येत आहे.

 

काँग्रेस पक्षात सत्ताधाऱ्यांच्या मदतीने गटबाजी चव्हाट्यावर आणली जात असून, गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जणू पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा सुरू केला असल्याचा विदारक चित्र आपल्या गडचिरोली जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
मागच्याच आठवड्यात आष्टी येथील काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते संजय पंदीलवार यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता,संजय पंदीलवार यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याने,आष्टी परिसरात काँग्रेस मध्ये मोठे भगदाड पडल्यानंतर सुध्दा त्यांची पत्नी रुपाली ताई पंदीलवार काँग्रेस पक्षात महिला अध्यक्ष पदावर विराजमान राहिल्यामुळे,काँग्रेस पक्षातील काही लोकांनी महिला अध्यक्षाच्या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण केले होते,विनाकारण ची पक्षात घुमसट होत असल्याने अखेर, रुपाली ताई पंदीलवार यांनी सुध्दा आता आपला राजीनामा देत असल्याचे पत्र काँग्रेस पक्षाच्या राज्याध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या कडे आज पाठवून दिले आहे.

एकीकडे राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले असताना, काँग्रेस पक्षात वारंवार होत असलेली गटबाजी रोखण्यासाठी मोठ्या नेत्यांना सुध्दा अपयश येत असेल तर येणाऱ्या काळात काँग्रेस मध्ये अजून किती भूकंप येतील याचा विचार न केलेलाच बरा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here