१५ आँगष्ट १९४७ रोजी आपला भारत स्वतंत्र झाला, आणि २६ जानेवारी १९५० रोजी भारतात,
भारतीय राज्य घटना अमलांत येवून प्रजासत्ताक राजप्रणालीचा अमंल सुरु झाला. म्हणजेच स्वतंत्र भारताचा कारभार लोकशाही पद्धतीने सुरू झाला. प्रजेच्या हातात सत्ता आल्याने , २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो.
आज आपण आपल्या देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करित आहोत.
प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतानाही आपल्याला स्वातंत्र्य दिनाचे व प्रजासत्ताक दिनाचे महत्व सांगितल जाते . नागरीक शास्त्रात याचे धडे गिरवले जातात.
तरीहीदेशातल्या अबाल वृद्धांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन कशाशी खातात हेच माहित नाही. स्वातंत्र्य दिनातला आणि प्रजासत्ताक दिनातला फरकही त्यांना कळत नाही. ही शरमेची बाब म्हणावी लागेल. हा राजकारणी लोकांचा व देशाच्या शैक्षणिक धोरणाचा, शैक्षणिक कार्यप्रणालीचा पराभव आहे. याला प्रगल्भ लोकशाही म्हणावी का ?