काँग्रेस मध्ये हे काय चाललय… ? यांना जोड्यांनी हाणायला हवे….  महेशबाबा घुगे.

0
198

 

 

नासिक विभाग पदवीधर मतदार संघातील निवडणुकीसाठी चौथ्यांदा काँग्रसने अधिकृत ऊमेदवारी जाहिर केल्या नंतरही, सुधीर तांबे नावाच्या स्वार्थांध माणसाने, काँग्रेस पक्षाला अंधारात ठेवून, पक्षाशी गद्दारी करुन, आपल्या मुलाच्या नावाने अपक्ष म्हणून अर्ज भरला. याची चीड भले , स्वतःच्याच पोळीवर तुप ओढून घेणार्या , कांँग्रेस पक्षाच्या दांभीक पुढार्यांना येणार नाही, पण ज्याच्या रक्तात, मुळा पासून कांग्रेस भिनली आहे ते हा निंदनीय प्रकार सहन करणार नाहीत.

अनेक वर्षे मंत्रीपद ऊपभोगलेल्या काँग्रेस पक्षाच्या संसंदीय मंडळाचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांचे निकटचे नातेवाईक , जेव्हा काँग्रेसच्या पाठीत खंजिर खुपसतात तेव्हा सर्वप्रथम बाळासाहेब थोरातांनी सुधीर तांबेना लाथा घातल्या पाहिजेत.

केवळ , सुधीर तांबेनीच गद्दारी केली नाही तर काँग्रेस पक्षाच्या जीवावर या आधुनिक संस्थानिकानी दहा पिढ्याचे कोट कल्याण करुन घेतले, व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्त्यांना वार्यावर सोडले , अशा अनेक गद्दारांनी या अगोदर , काँग्रेसशी प्रतारणा केली , त्यांना भविष्यात सुयोग्य धडा न मिळाल्याने ,सुधीर तांबे सारखी पिलावळ अशा प्रकारचे धाडस करु शकली.

या विषारी नागांना योग्य वेळी योग्य पद्धतीने ठेचले तर भविष्यात , ज्या ताटात खाल्लं त्या ताटात विष्ठा करायची हिमंत हे गद्दार करणार नाहीत.

अर्थात पाठीत खंजीर खुपसणारी पीलावळ केवळ काँग्रेस पक्षातच नाही तर ती ईतर पक्षातही आहे. आम्ही , आमच्या सारख्या तळागाळाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्ष जीवंत राहावा म्हणून रक्ताच पाणी केल, विरोध सहन केला. वेळी घरावर तुळशीपत्र ठेवल , त्यामुळे काँग्रेस मधील गद्दरापुरतेच बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे.

मात्र, हे असेच चालु राहिल्यास देशाची लोकशाही निकोप रहाणार नाही.

महेश घुगे.

जिल्हा समन्वयक

प्रशिक्षण व प्रबोधन समिती.

धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी. धुळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here