राष्ट्राभिमान बाळगणारे, सुसंस्कृत नागरीक निर्मिती साठी शिक्षणाची समान संधी आवश्यक…..महेशबाबा घुगे.

0
306

 

प्रबोधन….

सध्या देशात समानतेचे वारे वहात आहेत. स्त्री- पुरुषांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी म्हणून आग्रह धरला जात आहे. आता तर तृतीय पंथीय सुद्धा देशाच्या घटनेचा आधार घेत , आपला हक्क मागु लागले आहेत.
घटनेचाच आधार घेत, कायद्याच्या चौकटीत देशात समान नागरी कायद्यासाठी नागरीक आग्रही आहेत. आता तर केंद्र शासनच, समिन नागरी कायद्यासाठी प्रयत्नशिल असल्याने आज ना ऊद्या देशात समान नागरी कायद्याचीही अमंलबजावणी अशक्य नाही.
या पार्श्वभूमीवर ,देशातल्या सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांना आवश्यक ते शिक्षण घेण्यासाठी समान संधीचा कायदा का नसावा…स्वतंत्र भारतात , शिक्षणाला प्रधान्य दिले गेल्याने देशभरात शिक्षणाचे जाळे विनले गेले.
शिक्षण संस्थाना वारेमाप सवलती दिल्या गेल्याने , जो ऊठायचा तो शैक्षणिक संस्था काढायचा. विविध प्रकारच्या शैक्षणिक स्ंस्धा, अर्धाथ विद्यार्थी निर्मितीचे कारखाने ऊभारणारे आधुनिक संस्थानिक झालेत.शासनाकडून वारेमाप सवलतीचा लाभ घ्यायचा आणि त्या शैक्षणिक संस्थात शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना आर्थिक द्रुषँट्या लुबाडायचे. त्यामुळे हे शैक्षणिक संस्थाचे निर्माते, अर्थात आधुनिक कारखानदार धनाढ्य झालेत आणि त्या पैशाच्या माध्यमातून निवडणूकात विजय प्राप्त करुन सत्ताधारी सुद्ध झालेत.
अशा धनदांडग्या ,सत्ता पिपासू लोकांनी क्षिणण क्षैत्राचा बट्टयाबोळ केला असे म्हटल्यास अवाजवी ठरणार नाही.
शिक्षण संथातील संस्थानिका बरोबरच खाजगी शिकविण्यार्यांची चलाख थमात ऊदयास आली. या जमातीने सत्तधार्यांना हाताशी धरुन ,शैक्षणिक धोरणात नंगा नाच केला. खाजगी शिकविणी शिवाय विद्यार्थी चांगल्या गुणांनी ऊतीर्णच होऊ शकत नाही ही विचारहरणी या धुर्त शिक्षण सम्राटांनी समाजात रूजवली.
खाजगी शिकविण्या घेणार्याचे
लागेबांधे सबंधित यंत्रणेशी गुंफले गेल्याने प्रश्नपत्रिका प्राप्त करून आपल्या विद्यार्थ्यांना पुरवायची आणि शंभर  टक्के निकाल लागल्याचा गवगवा करुन गरजवंत विद्यार्थ्यांना लुबाडायचे,वकिल, डॉक्टर, प्राद्यापक ,अभियंते, व्यापारी क्षेत्रातील धनवान आपल्या मुलांना पाहिजे तैवढी फी भरुन खाजगी शिक्षण घेणारया सस्थात दाखल करावयाचे, आणि आपल्या मुलांना अवैध मार्गाने संधी ऊपलब्ध करुन घ्यायची,मग हुशार पण गरिब विद्यार्थ्याचे काय? त्यांनी शिक्षण कसे घ्यायचे. ?
कुठे गेली तुमची समान संधीची घोषणा. देशात खुलेआम पद्धतीने गरीब पण हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे त्यांच्या समस्याकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही.
या पार्श्वभूमीवर , राजस्थानच्या विद्यमान शिक्षण मंत्र्यांनी विधान सभेतच या अन्याय प्रवृत्तीमुळे गरीब, हुशार मुलांवर कसा अन्याय होत आहे, या बाबीला तोंड फोडले.समान शैक्षणिक संधी शिवाय , गरिब हुशार विद्यार्थ्यावरील अन्याय दूर होणे अशक्य असल्याचे  या शिक्षण मंत्र्यांचे म्हणणे आहे , पण कोण त्यांच्यामागे ऊभे रहाणार आहेत ,हे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here