पत्रकार दिन विशेष….प्रबोधन…
समाजात घडणार्या घटना,जैसे थे प्रतीबिंबीत करणारा घटक म्हणजे पत्रकार. महाराष्ट्रात पत्रकारीता रुजवणारे, पत्रकारांच महत्व विदित करणारे, पत्रकारांना समाजात मानाचे स्थान मिळवून देणारे बाळशास्त्री जांभेकर, यांनी 6जानेवारी 1832 रोजी ” दर्पण”नावाचे नियतकालीक सुरु केले, तेव्हा पासून ,महाराष्ट्रात त्याची स्मृती म्हणून 6 जानेवारी हा दिवस . पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
पत्रकार हा समाजातला महत्वपूर्ण घटक आहे. सत्ताधार्यावर अंकूश ठेवण्यासाठी आणि विरोधकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करुन
देण्यासाठी पत्रकारांना निःपक्षपातीपणाची भूमिका पार पाडावी लागते. त्यासाठी पत्रकाराची लेखणी, त्याचे आचार विचार हे निपक्षपाती ,निरपेक्ष, स्पष्ट,आणि, समाजहिताला पोषक असावे लागते. तसे असले तरच समाजावर, पर्यायाने शासनकर्त्यायावर पत्रकारांचा वचक राहू शकतो.
पत्रकार हा अप्रत्यक्षपणे न्याधिशाची भूमिका बजावत असतो. .त्यामुळे पत्रकार, निष्कलंक, निस्प्रुह, निर्भय,निडर आणि समाजाभिमुख असावा लागतो. समाजात पत्रकाराबद्दल आदरयुक्त भिती असणे गरजेचे असते.समाजविघातक क्रुतीवर प्रहार करण्याची क्षमता पत्रकारात असावी लागते.
अधिकारी , लोकप्रतिनिधी, कितीही ऊच्च पदस्थ, गर्भश्रीमंत, असला व तो भ्रष्ट ,गैरमार्ग अवलंबणारा असला , तर त्याच्यावर , आपल्या लेखणीद्वारे प्रहार करणारा, व समाजात त्याच पितळ ऊघड करण्याची धमक असणारा पत्रकार असायला हवा.कुठल्याही अमिशाला बळी न पडणारा, दांडगाईला न घाबरणारा , कुणाच्याही ताटा खालच मांजर बनून न राहाणारा पत्रकार हवा.
स्वातंत्र्य आणि, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पत्रकारांनी अशी कणखर भूमिका वठवली म्हणूनच या चळवळींना धार चढली व सर्वसामान्य माणूस विशिष्ठ ध्येयाने प्रेरीत झाला.
पत्रकारांनी बजावलेल्या कणखर भूभिके मुळेच भल्या भल्या राजकारण्यांना, ऊच्च पदस्थ अधिकार्यांना पदच्यूत व्हावे लागले , अनेकांना जेलची हवा खावी लागली , हे सांगणे न लागे.