Home ब्रेकिंग न्यूज गडचिरोली ठाण्याच्या पोलिस हवालदाराला 3500 रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक…

गडचिरोली ठाण्याच्या पोलिस हवालदाराला 3500 रुपयाची लाच घेतांना रंगेहाथ अटक…

0
2354

Gadchiroli district highlights.3/12/2022

 

गडचिरोली, 3 डिसेंबर : अटक करून जेलमध्ये न पाठवण्याचे व त्यास जमानत देण्याच्या कामाकरिता 3 हजार 500 रुपयांची लाच स्विकारताना गडचिरोली पोलीस स्टेशन येथील पोलीस हवालदार शकील बाबू सय्यद (50) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार तक्रारदाराच्या नातेवाईकाला अटक करून जेलमध्ये न पाठवण्याचे व त्यास जमानत देण्याच्या कामाकरिता गडचिरोली येथील पोलीस हवालदार यांनी 3 हजार 500 रुपयांच्या लाच रकमेची मागणी केली होती.  लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे सापळा रचला असता पोलीस स्टेशन गडचिरोली येथील तपास कक्षामध्ये शनिवार 3 डिसेंबर 2022 रोजी पोलीस हवालदार शकील बाबू सय्यद यांना तक्रारदाराकडून 3 हजार 500 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे  भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले, सफौ प्रमोद ढोरे, नापोशी राजू पदमगिरीवार, श्रीनिवास संगोजी, पोशी किशोर ठाकूर, संदीप उडाण, संदीप घोरमोडे, मपोशी विद्या म्हशाखेत्री व चालक पोलीस सवालदार तुळशीराम नवघरे यांनी केली आहे.

सरकारी कामे करण्यासाठी कोणी लाच मागितल्यास तक्रारदारांनी लाच प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन लाच प्रतिबंधक विभागाचे अधिकारी सुरेंद्र गरड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here