धुळ्यात आमदारांच्या हस्ते  “आनंद शिधा” वाटपाचा शुभारंभ…

0
159

Dhule district highlights…25/10/2022

धुळे::– तळागाळातील गोरगरिबांची दिवाळी गोड करण्याच्या ऊद्देशाने , मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाला अनुसरुन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, धुळयात, सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार चालक मालक संघर्ष समिति चे अध्यक्ष , जेष्ठ पत्रकार, महेशबाबा घुगे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ. फारुख शाह यांच्या हस्ते आनंद शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

धुळे शहरातील स्वस्त धान्य दुकान क्र. 32 मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमात , मार्गदर्शन करतांना आ.डाँ फारुख शाह यांनी , गोरगरीब जनतेला केवळ शंभर रुपयात, दीवाळी साजरी करण्यासाठी जीवनावश्यक वस्तु ऊपलब्ध करुन दिल्या बद्दल मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंन्दे यांचे आभार मानलेत.

शासनाने कोणताही जनकल्याणाचा निर्णय घेण्या अगोदर त्या निर्णयाची अमंल बजावणी करणारी यंत्रणा सज्ज ठेवायला हवी , शासन योजनांची घोषणा करते पण अमंल बजावणी करणार्या यंत्रणेचा अभाव असतो. असे , अध्यक्षपदावरुन बोलतांना महेशबाबा घुगे यांनी आमदार डॉ. फारुख शाह यांचे निदर्शनास आणून दिले.

शिधा वाटप करतांना साखरेचा पुरवठा न झाल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना लाभार्थ्याच्या रोशाला सामोरे जावे लागत  असल्याचेही महेशबाबां घुगे यांनीआमदार महोदयांच्या निदर्शनास आणून दिले . हा शिधा वाटप करतांना दिली जाणारी पावती,किचकट , व दुकानदारांना मनःस्ताप देणारी आसल्या बद्दलही महेश बाबांनी आपल्या मनोगतात नाराजी व्यक्त केली.

महेशबाबांनी व्यक्त केलेली नाराजी व सुचना मी पुरवठा मंत्र्यांना अवगत करेन असे अभिवचन आ. डॉ. फारख शाह यांनी या वेळी आपल्या भाषणाद्वारे दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here