Home राजकीय शिवसैनिक अरविंद कात्रटवार यांचा पक्षाला राजीनामा; संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या कार्यशैलीवर गंभीर...

शिवसैनिक अरविंद कात्रटवार यांचा पक्षाला राजीनामा; संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या कार्यशैलीवर गंभीर आरोप…

0
825

गडचिरोलीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का…

गडचिरोली –

गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून ३५ वर्षांपासून अविरत पक्षनिष्ठा जपणारे आणि असंख्य आंदोलनांच्या माध्यमातून जनतेसाठी लढा देणारे ज्येष्ठ शिवसैनिक अरविंद कात्रटवार यांनी आज पक्षाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील शिवसेना उबा-खांबाला हादरा बसला असून स्थानिक पातळीवर प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

 ३५ वर्षांची निष्ठा, बाळासाहेबांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून केले सेवा कार्य…

 

कात्रटवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिले आहे की ते मागील साडेतीन दशकांपासून हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या आदर्शावर आधारित काम करत होते. “८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण” हे ब्रीद जोपासत त्यांनी हजारो आंदोलने, मोर्चे आणि जनहितासाठी उपक्रम केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

पक्षात दुफळी निर्माण झाल्यानंतरही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबत उभे राहून गडचिरोली जिल्ह्यात पक्षाची ओळख मजबूत ठेवली, असे ते म्हणाले.

 

 “महेश केदारी यांच्या गैरकारभारामुळे मनोबल खच्चीकरण”

 

आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी जिल्हा संपर्कप्रमुख महेश केदारी यांच्या कार्यशैलीवर गंभीर आरोप केले आहेत.

कात्रटवार यांनी म्हटले आहे की संपर्कप्रमुख महेश केदारी हे निष्ठावंत शिवसैनिकांना दुर्लक्षित करत आहेत.पक्षासाठी काम न करणारे आणि जनतेत आधार नसलेल्यांना जवळ केले जात आहे.पदवाटपात पक्षनिष्ठांचा अपमान होत असून “आयाराम-गयाराम” तत्वावर पदवाटप केले जात आहे.

त्यांच्या कडे असलेले जिल्हा सहसंपर्क प्रमुख पद विनाकारण काढून घेण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या निष्ठेला आणि स्वाभिमानाला धक्का बसला.

कात्रटवार यांनी सांगितले की पद नसल्याने पक्षासाठी काम करताना सतत अडथळे निर्माण केले जात असून कार्यकर्त्यांचे मनोबल कमी करण्याचे प्रयत्न होत आहेत.

गडचिरोली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मागील अनेक वर्षांपासून तयारी असून तरीही केदारी यांच्या दबावामुळे त्यांना बी-फॉर्म मिळण्याची कोणतीही शक्यता नाही, असा दावा त्यांनी केला.

त्यामुळे पक्षात अन्याय होत असल्याचा त्रास सहन करणे अशक्य झाल्याने अखेर पक्ष सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

 

“शेकडो समर्थकांसह पक्षाला जय महाराष्ट्र”

 

कात्रटवार म्हणतात की “पक्षाचा त्याग करताना मला दुःख होत आहे; पण महेश केदारीसारख्या लोकांमुळे गडचिरोलीतील पक्षाची अधोगती होत आहे. त्यामुळे मी आणि माझे शेकडो समर्थक पक्षाला कायमचा जय महाराष्ट्र करीत आहोत.”

 

 जिल्ह्यातील राजकारणात नवे समीकरण…

अरविंद कात्रटवार यांचा राजीनामा हा गडचिरोली जिल्ह्यात शिवसेना (उभठा) गटासाठी मोठा धक्का मानला जात असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here