गडचिरोली:गडचिरोली शहरातील मध्यभागी, चंद्रपूर रोडवर असलेल्या प्राईम हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया ही एक महत्त्वाची वैद्यकीय प्रक्रिया आहे, ज्यामध्ये नैसर्गिक हिप सांध्याचा (hip joint) रोगग्रस्त भाग काढून टाकून त्याऐवजी कृत्रिम सांधा बसविला जातो. या प्रक्रियेला हिप आर्थ्रोप्लास्टी असेही म्हटले जाते.
या शस्त्रक्रियेचा मुख्य उद्देश म्हणजे — वेदना कमी करणे, हिपच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि रुग्णाच्या एकूण जीवनमानात वाढ करणे हा आहे.
साधारणपणे ही शस्त्रक्रिया १ ते २ तास चालते, आणि त्यानंतर रुग्णाला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे ३ ते ८ आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.
ही शस्त्रक्रिया दिनांक २८/०९/२०२५ रोजी डॉ. मयूर नन्नावरे, डॉ. जयश्री देवगडे, तसेच अॅनेस्थेशिया विशेषज्ञ डॉ. मित्तल गेडाम यांच्या टीमने यशस्वीरित्या पूर्ण केली.
शस्त्रक्रियेनंतर केवळ २४ तासांच्या आत रुग्ण वॉकरच्या मदतीने चालू लागला, ही बाब अत्यंत उल्लेखनीय आहे.
