गडचिरोली:नवी दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान वकिल राकेश किशोर यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून भ्याड हल्ला केला. या निंदनीय प्रकाराचा गडचिरोलीसह अहेरी येथे तीव्र निषेध करण्यात आला.
हा प्रकार लोकशाही आणि संविधानाचा घोर अपमान करणारा असून, अशा कृतीस जबाबदार असलेल्या वकिलास तात्काळ अटक करून निलंबित करण्यात यावे, जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी अधिवक्ता संघाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भात जिल्हा अधिवक्ता संघाने जिल्हा व सत्र न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन पाठविले आहे.
निवेदन देताना अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट. किशोर आखाडे, सचिव ऍडव्होकेट. प्रमोद ब्राह्मणवाडे, एडवोकेट संजय ठाकरे, ऍडव्होकेट. कविता मोहरकर यांच्यासह मोठ्या संख्येने वकील उपस्थित होते.
“कठोर शिक्षा करावी” — ऍड. किशोर आखाडे
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सोमवारी (दि. ६) राकेश किशोर या वकिलाने बूट फेकल्याची घटना अत्यंत निंदनीय असून, अशा जातीयवादी आणि समाजकंटक व्यक्तीस कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वकील संघाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
देशात लोकशाही, न्याय आणि सर्वधर्मसमभावाचे तत्व असताना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांवरच हल्ला होणे हे संतापजनक आहे. या घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई यांनी संयम राखला, मात्र अशा समाजकंटकाला कठोर शिक्षा देऊन त्याचे वकीली परवाना (लायसन्स) रद्द करण्यात यावे, अशी मागणी अधिवक्ता संघाने केली आहे.
ही मागणी अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट. किशोर आखाडे, सचिव ऍडव्होकेट. प्रमोद ब्राह्मणवाडे, ऍडव्होकेट. कविता मोहरकर, ऍडव्होकेट. विलास न्यालेवार, ऍडव्होकेट. संजय देशमुख, ऍडव्होकेट. दीपक उंदीरवाडे, ऍडव्होकेट. फाल्गुन सहारे, ऍडव्होकेट. नरेंद्र बावणे, ऍडव्होकेट. सोनाली मेश्राम, ऍडव्होकेट. ऍडव्होकेट स्नेहा मेश्राम, ऍडव्होकेट. पल्लवी केदार, ऍडव्होकेट. योगिता धात्रक, ऍडव्होकेट. करिष्मा भैसारे, ऍडव्होकेट. नीलिमा जुमनाके, ऍडव्होकेट. पायल धाईत, ऍडव्होकेट. सुजाता गेडाम, ऍडव्होकेट. अपर्णा हेडो यांच्यासह शेकडो वकिलांनी केली आहे.
