उबाठा शिवसेनेचे युवासेना जिल्हाप्रमुखांवर गोवंश तस्करीचा आरोप…?

0
774
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; motionR: 0; delta:null; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 39;

गडचिरोली:गडचिरोली मुख्यालयापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या शिवणी गावातील पशुपालक आणि गोरक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्ह्यातील उबाठा शिवसेना मधील युवा सेना जिल्हाप्रमुख पवन गेडाम यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पवन गेडाम यांनी पशु मालकांना पैशाचे आमिष दाखवले आणि त्यांची गौवंशीय जनावरे बाजारात खरेदी करण्याचे बहाणे करून प्रत्यक्षात बैलांना गौतस्करीसाठी विकले असल्याची शंका पशु मालकांनी जाहीर केलेली आहे.

 

हवामानामुळे वारंवार पीक खराब झाल्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांची जनावरे विकतात. तथापि, पवन गेडाम यांनी या शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेतला. त्यांनी त्यांना अधिक पैसे देण्याचे आश्वासन दिले आणि गुरांच्या बाजारात नाममात्र शुल्क भरल्यानंतर उर्वरित रक्कम दुप्पट करून काही दिवसांत परत करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी हे प्राणी गायींच्या तस्करीसाठी विकले गेले असेल याची गंभीर चौकशी पोलिसांना करावी अशी अपेक्षा गोरक्षकांनी व्यक्त केली.

एकूण 43 जनावरे विकत घेतली हे सावली कृषी बाजारातील पावत्यांवरून दिसून येते,या वेळी सादर  केलेल्या पुराव्यात पावती वरून सावली कृषी बाजारात खरेदी केलेल्या ४३ जनावरांचा समावेश होता. शेजारील अनेक तालुक्यांमधील कृषी बाजार समिती कार्यालयांमध्ये केलेल्या जनावरांच्या खरेदीचीही सखोल चौकशी करावी अशी मागणी पशु मालकांनी पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीत केली आहे.

 

पत्रकार परिषदेत पशु मालक आणि गोरक्षकांनी असेही म्हटले आहे की, कट्टरपंथी हिंदुत्वाच्या नावाखाली शिवसेनेत सामील होऊन या बेकायदेशीर प्राण्यांच्या तस्करीत सहभागी असलेल्या पवन गेडाम यांच्यावर वरिष्ठ नेत्यांनी तात्काळ कारवाई करावी.

 

विशेष: पत्रकार परिषदेदरम्यान गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे अचानक हजर झाले तेव्हा उपस्थित पशु मालक आणि गोरक्षकांनी त्यांना आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आवाहन केले.

 

आमदार मिलिंद नरोटे यांची प्रतिक्रिया…

 

काही वेळापूर्वीच, मला पशु मालकांकडून माहिती मिळाली की आरोपींनी त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची जनावरे कसायाला विकली आहेत. मी पीडितांना पूर्ण पाठिंबा देईन आणि आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करेन.

 

उबाठा सह संपर्क प्रमुख विजय शृंगारपवार यांची प्रतिक्रिया…

पवन गेडाम अगोदर भाजपात सक्रिय होता,मी स्वतः त्याला शिवसेनेत आल्या आल्या युवा सेना चा प्रमुख पद द्यायला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे विरोध केला होता,पण त्याची दखल न घेता त्याला पक्षाचे मुख्य जिल्हाप्रमुख बनवण्याचे काही वरिष्ठ नेते त्याचे नाव चालवित होते,जिल्ह्यातील मुख्य पदाधिकारी यांची तक्रार करत याला आता पुन्हा जिल्हाप्रमुख होण्याचे डोहाळे लागले होते त्या करिता त्याचे मुंबई वारे सुरू झाले होते.गौवंश तस्करीत किवा तस्करांना गौवंश विकण्यात पवन गेडाम चा सहभाग असेल तर वरिष्ठांना कळवून त्याला पदा वरून आणि पक्षातुन बडतर्फ करण्याची शिफारस केली जाईल,या अगोदर पण शिवनी प्रकरणात याची वरिष्ठा कडे तक्रार केली होती.

जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांची प्रतिक्रिया…

 

उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख वासुदेव शेडमाके यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “शेतकरी आणि गोरक्षकांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबद्दल मला माहिती मिळाली आहे. बाधित पशुपालकांनी आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेल्या निवेदनाद्वारे आरोपी पवन गेडाम यांच्यावर कारवाई करण्याची विनंतीही केली होती. मी ती तक्रार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना कळवली आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here