कांग्रेस चे 150 कार्यकर्ते भाजपात शामिल… धानोऱ्यात काँग्रेस ची झाली दयनीय परिस्थिती….

0
1083

 

गडचिरोली: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत घेतलेल्या कार्यक्रमात धानोरा तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते आपल्या पक्षाला राम राम करून दोन मोठ्या नेत्यांसह 150 कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

प्रत्येक निवडणुकीत किंवा संघटनात्मक कार्यात काँग्रेस पक्षाला नेहमी अग्रेसर करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावत एक निष्ठेने काम करणारे तसेच कोणत्याही पदाची लालसा न ठेवणारे धानोरा तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते मल्लिक बुधवाणी व श्रीनिवास दुल्लमवार यांच्या नेतृत्वात जवळ पास 150 कार्यकर्ते भाजप मध्ये गेल्याने धानोरा तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा हादराच बसला असल्याचे सांगितले जात असून आपल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा वारंवार अपमान करून धानोरा तालुक्यातील विकास कामांच्या विषयावर मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे काँग्रेस ची दयनीय परिस्थिती निर्माण झाल्याची जोरदार चर्चा सुरू झालेली दिसत आहे.

मागील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला हजारो मतांची आघाडी मिळवून देणारे व तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढे येऊन सामाजिक सेवेची कमान उभी करणारे कार्यकर्ते आता काँग्रेस पक्षाला सोडून गेल्यामुळे काँग्रेस पक्षात अंतर्गत वाद सुरु झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

भाजपा मध्ये नेहमीच एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा विचार करून जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच गंभीरतेने प्रयत्न केले जातात आणि नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी या साठी आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसह भाजप मध्ये प्रवेश केल्याची माहिती मल्लिक बुधवाणी आणि श्रीनिवास दुल्लमवार यांनी दिलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here