कोरची तालुक्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय विभागांशी संबंधित अडचणी, समस्या व प्रश्नांची त्वरित आणि प्रभावी सोडवणूक एकाच ठिकाणी व्हावी, या उद्देशाने तहसील कार्यालयात जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी बिरसा मुंडा सभागृह, तहसील कार्यालय, कोरची येथे पार पडणार आहे.
या वेळी कृषी विभाग, महावितरण, महसूल विभाग (तलाठी, मंडळ अधिकारी), सर्व ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती (ग्रामसेवक), पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, पोलीस विभाग, वन विभाग, भूमी अभिलेख विभाग (आखीव पत्रिका संदर्भात) यांसह इतर संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
नागरिकांच्या समस्या तात्काळ नोंदवून त्यावर आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे. सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार रामदास मसराम यांनी केले आहे.