गडचिरोली:गडचिरोली मुख्यालयापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या चुरचुरा गावात जंगली हत्तीने ने केलेल्या हल्यात ५२ वर्षाच्या गुराख्याची मृत्यू झाल्याची घटना दुपारी चार वाजता घडली.
या घटनेची माहिती घेतली असता पोर्ला वन परिक्षेत्र कार्यालयातील कंपार्टमेंट ३ मधील चुरचुरा गावात ही घटना घडली होती.
जंगली हत्तीच्या हल्यात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव वामन गेडाम वय 56 वर्षे असून तो गाई बैलांना चारण्याचे काम करीत असल्याची माहिती गावकऱ्यांनी यावेळी दिली होती. मागील दोन वर्षांपासून जंगली हत्तीच्या हल्यात वेळोवेळी निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडत असताना वन विभागाच्या आणि राज्य सरकारच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. जंगली प्राण्याच्या हल्यात मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देऊन वन विभाग आणि राज्य सरकारने आपली महत्वाची जबाबदारी पार पाडण्याची फक्त औपचारिकता पूर्ण करीत असल्याचे आरोप या ग्रामीण भागातील लोकांनी केलेले आहे.