गडचिरोली: शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या धानोरा रोडवरील एस ओ एस शाळेजवळ दारू पिऊन चालविणाऱ्या स्कूल व्हॅन ने धडक देऊन एक महिले सह दोन व्यक्ती जखमी झाल्याची घटना आज सकाळी ८ वाजता च्या दरम्यान घडली.
या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता इंदिरा नगर येथील रहिवासी सोमेश्वर नागोसे वय ४२ वर्ष हा आपली दुचाकी घेऊन इंदिरा नगर कडून गडचिरोली कडे आपल्या कामाच्या ठिकाणी येत असताना एका महिलेने त्याला दुचाकीवर गडचिरोली शहरात सोडून देण्याची विनंती केली होती,त्या महिले सह आपल्या दुचाकीला घेऊन येत असताना अचानक एक भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूल व्हॅन क्रमांक MH 27- AC 4526 ने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता दुचाकीस्वार सोमेश्वर ची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला ताबडतोब नागपूर येथे दाखल करण्यात आले होते,त्यानंतर उपचार सुरू असताना सायंकाळी साडे सात वाजता सोमेश्वर चा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेत स्कूल व्हॅन चालविणारा व्यक्ती दारूच्या नशेत धुंद असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिली होती.घटनेची माहिती पोलिसांना विचारली असता अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या अपघातात जखमी झालेल्या महिलेचे नाव मिळू शकले नाही.
स्कूल व्हॅन चालविणारा व्यक्ती दारूच्या नशेत असल्याची माहिती होताच स्कूल व्हॅन चे मालक पारडवार यांनी पीडित जखमी लोकांना परस्पर आर्थिक मदत देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा गडचिरोली शहरात सुरु झाल्याने स्कूल व्हॅन चालविणारे गाडी मालक हे परिवहन कायद्याचा पालन न करता वाहतूक विभागाचे खिसे गरम वाहतूक कायदाच धाब्यावर बसविण्याची विदारक परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे.