गडचिरोली ::
भारताचे माजी पंतप्रधान, भारतीय संगणक क्रांतीचे जनक व भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालयात अभिवादन कार्यक्रम करण्यात आले.
या प्रसंगी शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि. प. सदस्य तथा राजीव गांधी पंचायत राज संघटन प्रदेश सचिव कुसुमताई आलाम, सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष नंदू वाईलकर, अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, सहकार सेल अध्यक्ष अब्दुल पंजवानी, सोशल मीडिया सेल अध्यक्ष संजय चन्ने माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू कायरकर, दीपक भाऊ मडके, सुनील भाऊ डोगरा, सुरेश भांडेकर, उत्तम ठाकरे, अनिल कोठारे, हरबाजी मोरे, काशिनाथ भडके, उमेश आखाडे, प्रभाकर कुबडे, राजेंद्र कुकुडकर, हेमंत मोहितकर, कैलास शर्मा, कुनघाडकर जी, स्वप्नील बेहरे, माजीद सय्यद, गौरव येनप्रेडिवार, जावेद खान, महिला तालुकाध्यक्ष कल्पनाताई नंदेश्वर, सौ. माधुरी मडावी, सौ. कविता उराडे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. अपर्णा खेवले, सौ. शालिनी पेंदाम, सौ. रिता गोवर्धन सह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
सर्व मान्यवर व कार्यकर्त्यांनी स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन अर्पण केले आणि त्यांच्या आदर्श कार्याचे स्मरण करून भारताच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.