गडचिरोली जिल्ह्याची व्यापार नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या वडसा देसाईगंज शहरात एका ज्वेलरी व्यवसायिकाने 23 वर्षी युवतीवर लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.
या घटनेचे सविस्तर माहिती घेतली असता आरोपी सुनिल पुंडलिकराव बोके, वय अंदाजे 48 वर्ष, रा. गांधीवार्ड, देसाईगंज ता. देसाईगंज जि. गडचिरोली याने पीडितेला लग्नाचे आमिश दाखवुन व तिचे अश्लील फोटो सोशल मिडीआवर व्हायरल करण्याची धमकी देवुन स्वःताच्या राहत्या घरातील बेडरुमध्ये व त्याच्या स्वताच्या चारचाकी वाहनामध्ये पिडिते सोबत वारंवार शाररीक संबंध प्रस्तापित केले होते. अनेक वेळा पीडित युवतीने आरोपीला लग्न करण्याकरिता दबाव आणल्याने आरोपी सुनील ने तिला तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वारंवार धमकी देत असल्यामुळे पीडित युवतीने आरोपीचे मोबाईल नंबर ब्लॉक करून घेतले यामुळे आरोपी सुनील ने आपला मित्र अक्षय कुंदनवार याला पीडितेशी संपर्क करायला सांगितले होते.
आरोपी क्रमांक 2) नामे अक्षय कुंदनवार याने सतत पाठलाग करुन तु सुनिल बोके यास भेटायला पाहिजे, असे म्हणाले असता फिर्यादी हिने सुनिल बोके याने मला धोका दिलेला आहे त्याच्याशी बोलण्याची व भेटण्याची माझी इच्छा नाही त्यामुळे तु मला वारंवार फोन करु नकोस असे सांगुन आरोपीचे मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकला असता यातील नमुद आरोपीताने मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये का टाकलेला मोबाईल नंबर ब्लॉक लिस्ट मधुन काढ नाहीतर मी तुझा सतत पाठलाग करीत राहीन व तुझ्या पूर्ण हालचालीवर लक्ष ठेवून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली होती. अखेर दोन्ही आरोपींच्या जाचाला कंटाळून देसाईगंज ठाण्यात तक्रार दाखल केली.
फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरुन पोस्टे देसाईगंज येथे कलम 64 (2) ,(M),69,78,351(2),3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला.
पोलिसांनी लगेच तक्रारीची दखल घेत दोन्ही आरोपींवर रात्री उशिरा गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींचे शहरात शोध घेऊन ताबडतोब अटक केली आज रविवार सुट्टीचा दिवस असताना सुद्धा देसाईगंज पोलीस प्रशासनाने निवासी न्यायालयाच्या समक्ष दोन्ही आरोपींना हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना 19 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर करीत आहेत