गडचिरोलीत कचऱ्याचे साम्राज्य – नागरिकांच्या आरोग्याला धोका… !

0
481

 

गडचिरोली : चंद्रपूर रोडवरील ठवरे हॉस्पिटल तलाव जवळील चनकाई नगर ते गोकुळ नगर मार्गावर पुलाचे पाईप चोकअप झाल्याने मोठ्या प्रमाणात कचरा व सांडपाणी रस्त्यावर साचले आहे. नाल्याचे व गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच ये-जा करावी लागत आहे.

 

रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग पडलेले असून मृत जनावरे टाकल्याने परिसरात भीषण अस्वच्छता निर्माण झाली आहे. या अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

या प्रश्नासंदर्भात वारंवार नगरपरिषद गडचिरोलीकडे तक्रारी करण्यात आल्या; मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चुकीच्या नियोजन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शहरात दररोज नवनव्या समस्या उभ्या राहत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

 

ही समस्या तातडीने सोडवावी, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रश्नावर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे अल्पसंख्याक आयोग जिल्हाध्यक्ष आरिफ कनोजे, तालुकाध्यक्ष जावेद खान व शहराध्यक्ष रिजवान शहा यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here