होंडा शोरूमजवळील इमारतीचा स्लॅब कोसळला – तिघांचा मृत्यू, पाच जखमी; नगरपरिषदेविरोधात जनतेत संताप

0
1061

 

आरमोरी (ता. आरमोरी) – आज संध्याकाळी साधारण सहा वाजताच्या सुमारास लालानी यांचे होंडा शोरूमजवळील जुनी इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, ही इमारत जीर्ण अवस्थेत असूनही नगरपरिषदेकडून तिची तपासणी करण्यात आलेली नव्हती. शहरातील अनेक जुनी, पडझड झालेल्या अवस्थेतील इमारतींचा सर्वेक्षण न करणे, घरं पडण्याच्या स्थितीत असूनही योग्य वेळी कारवाई न करणे आणि फक्त महसूल वसुलीवर लक्ष केंद्रीत ठेवणे — हेच या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, नगरपरिषद प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरला आहे. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन पथके दाखल झाली असून, बचावकार्य सुरू आहे. अधिकृत मृत आणि जखमींची संख्या अद्याप बदलू शकते, कारण ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

अधिकृत स्रोतांकडून पुढील माहिती मिळताच ती प्रसिद्ध करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here