शिंदेंच्या शिवसेनेत दोन प्रमुख गटात झाली तुफान हाणामारी…

0
1800

 

 

गडचिरोली:मागील दोन महिन्यापूर्वी सरपंच संघटनेचे नेते संदीप ठाकूर यांना गडचिरोली व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती यामुळे भविष्यात सुरजागढ च्या माध्यमातून मिळणाऱ्या मलाईत हिस्सेदारी दुसऱ्या गटाला दिल्या जाईल या वादातून अनेक प्रकारचे मतभेद दोन्ही गटाच्या लोकांमध्ये नेहमीच दिसून येत होते, त्यामुळे पूर्वीचे कार्यरत गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झालेली दिसून आली होती.अनेक वेळा शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना दोन्ही गटाच्या प्रमुखांना वारंवार समज देऊन पक्षवाढी करीता काम करण्याचे आवाहन करावे लागले होते.

 

आज राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे गडचिरोली जिल्ह्यातील झालेल्या दौऱ्यात शिवसेनेच्या दोन्ही गटात मंत्र्यांच्या दौऱ्याचे श्रेय घेण्या वरून तुफान हाणामारी झाली होती, या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता शिंदे सेनेच्या महिला संपर्क प्रमुख वर्षा मोरे यांच्याशी नव्याने जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त झालेले संदीप ठाकूर यांनी अरेरावी करून उद्धृत भाषेत संभाषण सुरू केल्यामुळे युवा सेनेच्या शिवसैनिकांनी त्यांना चांगला चोप दिल्याची ही घटना आज घडली होती.

या घटनेमुळे शिंदे गटात प्रचंड मतभेद निर्माण झाले असल्याचे चित्र आज कॉम्प्लेक्स येथील सर्किट हाऊसमध्ये पाहायला मिळाले.या घटनेची दोन्ही गटाच्या लोकांनी एकमेकांविरोधात पोलिस तक्रार दाखल केली आहे,या तक्रारीवर पोलिस प्रशासन कोणती कारवाई करणार यावर लक्ष लागले आहे.

संदीप ठाकूर यांची प्रतिक्रिया…

आज शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्रमात मी आज गडचिरोलीला आलो होतो,परंतु काटलीच्या अपघाताची माहिती मंत्र्यांना मिळताच मंत्री लगेच घटनास्थळी दाखल झाले त्या वेळेस मी माझ्या दोन्ही विधान सभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी काही वेळाकरीता मी कॉम्प्लेक्स येथील विश्राम गृहात बसलेलो असताना राकेश बेलसरे यांनी आमच्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे महिला प्रमुख अर्चना गोंधोळे यांच्याशी अभद्र भाषेत संभाषण केल्यामुळे मी जिल्ह्याच्या महिला संपर्क प्रमुख वर्षा मोरे यांना संबोधून राकेश बेलसरे यांना समज देण्याची विनंती केली होती.त्यामुळे आमच्या दोन्ही गटात थोडी बाचाबाची झाली होती माझ्या वतीने कोणत्याही महिला पदाधिकाऱ्याला चुकीची वागणूक देण्यात आली नव्हती.उलट उलटा चोर कोतवाल को डांटे अशी भूमिका दूसर्या गटाने दाखवलेली आहे.

संदीप ठाकूर सरपंच संघटनेचे नेते व आरमोरी विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here