वसंत शाळेच्या अल्पवयीन विद्यार्थ्याला एस टी महिला वाहकाने केली मारहाण….

0
1599

गडचिरोली: शहरातील वसंत शाळेत शिकणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याला एस टी बस च्या महिला वाहकाने मारहाण केल्याची घटना दुपारी 4.45 सुमारास घडली.

या प्रकरणी सविस्तर माहिती घेतली असता MH 40Y 5762 क्रमांकाची एस टी बस पोटेगाव परिसरातील लोकांना सोडून आल्यानंतर चंद्रपूर येथे जाण्याकरिता फलाट क्रमांक 1 वर थांबलेली होती.सदर बस मधून काही प्रवासी बस स्थानकावर उतरत असतांना एक तन्मय सोमेश्वर भरडकर नावाचा 16 वर्षाचा मुलगा बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करीत असताना सदर बस मधील महिला वाहक कला शिडाम यांनी कशाला एवढी गडबड करतोस असे बोलून अचानक थापड मारली आणि ही बस तुझ्या घरची  आहे काय अशी उद्धट भाषा बोलून या तन्मय सोमेश्वर भरडकर नावाच्या विद्यार्थ्याला बस मध्ये न बसविता बस चंद्रपूर करीता सोडून दिली.
सदर तन्मय नावाच्या मुलाने आपल्या भावाला मारहाण केल्याचे सांगितल्या नंतर भाऊ आला आणि बस च्या महिला वाहकांशी मारहाण का केली अशी विचारणा केली असता ही काय तुमच्या घरची बस आहे काय अशी प्रतिक्रिया देऊन तुमच्याशी जे बनते ते करून घ्या अशी मुजोरीच केली असल्याची माहिती त्या ठिकाणी उभे असलेले प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितली.

पीडित विद्यार्थ्याने आपल्या भावाच्या मदतीने स्वतः तक्रार बुकवर तक्रार नोंदविली असून त्या मध्ये दोषी महिला वाहक कला शिडाम यांचे वर कारवाई करावी मागणी तक्रार बुकवर नोंदवली आहे.

या घटनेची माहिती एस टी बस चे जिल्हा कंट्रोलर अशोक वाढीभस्मे यांना देण्यात आली असून या घटनेची cctv बघून दोषी महिला वाहक कला शिडाम यांचे वर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here