खासदार डॉ. नामदेव कीरसान यांचे आरोप खोटे व निराधार – अ‍ॅड. विजय चाटे यांचे परखड मत.

0
397

 

 

गडचिरोली, 18 मे 2025 – गडचिरोली जिल्ह्यातील शिवसेनेचे सहपालकमंत्री नामदार आशिष जयस्वाल यांच्यावर भाजप स्थानिक कार्यकर्ते नाराज असल्याचा आरोप खासदार डॉ. नामदेव कीरसान यांनी केला होता. मात्र, हा आरोप खोटा, निराधार आणि भाजप-शिवसेना यांच्यात भिंत उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे परखड मत भाजप विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. विजय चाटे यांनी व्यक्त केले आहे.

 

अ‍ॅड. चाटे यांनी स्पष्ट केले आहे की, सह पालकमंत्रि जयस्वाल यांच्या गडचिरोली दौऱ्यांमुळे जिल्ह्यातील शेतकरी, सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत. हत्तीच्या नुकसानीबाबत मोबदला मिळवून देणे, रस्त्यांच्या सुधारणा, दवाखान्यांच्या अडचणी, घरकुल जाहिरात अडचणी, अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात आली आहे.”

 

त्यांनी पुढे सांगितले की, “भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सतत सह पालक मंत्री जयस्वाल यांच्या संपर्कात असून, त्यांच्यासोबत सर्किट हाऊस वा पत्रकार परिषदेत उपस्थित राहून विविध समस्या मांडत असतात. त्यांना सदैव सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.”

 

मा. जयस्वाल यांच्यासोबत शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अ‍ॅड. विजय चाटे स्वतः सक्रीय असतात. तसेच माजी खासदार डॉ. अशोक नेते,माजी आमदार डॉ देवराव होळी,प्रदेश महिला सदस्य रेखाताई डोळस, राकेश बेलसरे भाजपाचे माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे,मंगेश रणदिवे  व इतर वरिष्ठ पदाधिकारी देखील त्यांच्या सोबत कार्यरत आहेत.

 

अलीकडेच राबविण्यात आलेल्या 57 कोटींच्या नळ योजनेतही भाजपाचे माजी आमदार कृष्णा गजबे,माजी नगराध्यक्ष पवन नारनवरे आणि कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत असल्याचे चाटे यांनी नमूद केले.

 

“भाजप आणि शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा डॉ. नामदेव किरसान यांचा हा प्रयत्न हाणून पाडला जाईल. जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना सहपालकमंत्री यांच्यात उत्तम समन्वय आहे,” असेही अ‍ॅड. चाटे यांनी ठामपणे सांगितले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here