प्राण्यांमुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदतीचा दिलासा: ऍड. विजय चाटे यांचा पुढाकार…

0
34

 

गडचिरोली:

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. खासकरून तस्कर हत्तीने केलेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीचे सहपालकमंत्री ऍड. अशीषजी जयस्वाल यांनी नुकत्याच गडचिरोली दौऱ्यात वनविभाग व बांधकाम विभागाचा आढावा घेतला आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तात्काळ देण्याचे आदेश दिले. व काही शेतकऱ्यांना एका तासाच्या आत  ताबडतोब नुकसान भरपाई मिळवून दिली,

 

या कार्यवाहीत भाजप विधी आघाडीचे जिल्हाध्यक्ष ऍड. विजय चाटे यांनीही पुढाकार घेत, जिल्ह्यातील शेतकऱ्यांची माहिती वनविभागापर्यंत पोहोचवून प्रत्यक्ष मदतीसाठी संपर्क साधला आहे. वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांचा अर्ज, फोटो व पंचनामा संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

 

“प्रत्येक पीडित शेतकऱ्याला न्याय मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे. कुणाचं नुकसान दुर्लक्षित होणार नाही. गरजवंत शेतकऱ्यांनी थेट माझ्याशी मोबाईल 8888454570 वर संपर्क साधावा,” असे आवाहन ऍड. विजय चाटे यांनी केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here