गडचिरोली: गडचिरोली जिल्हा न्यायालयात मुख्य न्यायाधीशांच्या सुरक्षेत असलेल्या पोलिस शिपायाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजता च्या सुमारास घडली.
या घटनेची सविस्तर माहिती घेतली असता मृतक शिपायकडे असलेली एके ४७ रायफल मधून स्वयंचलित मोड असलेल्या स्थितीत चुकीने ट्रिगर दबल्याने बंदुकीतून सात आठ राऊंड फायर झाले, त्यापैकी तीन गोळ्या शिपायाच्या छातीत लागलेल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मृतक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव उमाजी केवळराम होळी वय ४३ वर्ष राहणार बेलगाव तालुका जिल्हा गडचिरोली असल्याची माहिती मृतकाच्या कुटुंबीयांनी दिली होती.
मृतक उमाजी यांच्या कुटुंबात आई,पत्नी आणि दोन मुली असल्याची माहिती मृताकाच्या परिवारातील एका सदस्यानी दिली.