राज्यपालांना भेटण्यास फक्त मर्जीतल्या पत्रकारांना अनुमती…राजकीय पक्ष आणि काही संघटनांनी केला कार्यक्रमाचा विरोध.

0
77

 

गडचिरोली: आज २ ऑक्टोंबर ला गोंडवाना विद्यापीठाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाचे ११वें व १२वें दीक्षांत समारोह घेण्यात आले आहे.महामहीम राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यापीठा द्वारे शिफारस केलेल्या दोन मंत्री,काही गणमान्य लोकांना डी लीट आणि गोल्ड मेडल व जीवन साधना गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.या कार्यक्रमांची सविस्तर माहिती देण्यासाठी दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेण्यात आली होती,त्या पत्रकार परिषदेत जास्त प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना राज्यपालांना भेटण्यास मुद्दाम डावलण्यात आले आहेत.

निवासी उप जिल्हाधिकारी यांच्या सहीने निघालेल्या आदेशात ज्या पत्रकारांची नावं यादीत नव्हती त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी राज्यपालांच्या कार्यालयातून आलेल्या यादी नुसार पत्रकांना अधिकृत आदेश काढून च बोलवण्यात आले आहेत असे सांगितले तर थोडिशी सखोल माहिती मागितली असता मीच स्वतः पत्रकारांचे नाव टाकलेले नाही असे समजून घ्या असे उद्दट प्रतीसात दिले.तर यांचं विषयावर प्रभारी जिल्हाधिकारी आयुषी सिंग यांना विचारले असता त्यांनी राज्यपालांच्या गोंदिया जिल्ह्यातील झालेल्या कार्यक्रमात फक्त चार च पत्रकारांना बोलवण्यात आले असून आम्ही तर बारा पत्रकारांना बोलविले आहे अशी बतावणी केली होती,पण पुन्हा काही पत्रकारांचा दबाब आल्याने काही पत्रकारांना रात्रीच पास देण्यात आलेले होते.

 

*विद्यापीठाच्या कार्यक्रमांचे अनेक राजकीय पक्ष आणि संघटना चा विरोध…* 

विद्यापीठाने सर्व कायदेशीर प्रक्रिया व निकष पूर्ण न करताच शिफारस केल्याचा आरोप अनेक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी केला आहे.

विद्यापीठाच्या परिक्षेत्रात आपल्या सामाजिक कार्यात प्रसिध्द असलेल्या ज्येष्ठ व्यक्तीस जीवन साधना गौरव पुरस्कार देण्यात येतो पण समस्त निकष सोडून संघ परिवारा च्या जवळीक असलेल्या डॉ.शरद सालफळे यांना पुरस्कार देण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आल्याचे दिसून येताच अनेक पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन आज जाहीर विरोध केला.

या कार्यक्रमात मुख्य अतिथिनांच डी लिट देणे,कार्यक्रमाच्या पत्रिकेत स्थानिक मंत्र्यांचेच नाव डावलणयात आल्याने ह्या कार्यक्रमात भाजप व संघ परिवाराच्या लोकांनाच सन्मानित करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याची खमंग चर्चा गावात होतांना दिसून आली आहे.

या अजब गजब कारभाराला जबाबदार असलेले कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी कुलगुरू पदाचा राजीनामा द्यावा आणि स्वयं सेवक संघाचे पूर्ण कालीन संघ प्रचारक व्हावे अशी टीका आंदोलन कर्त्यांनी केलेली आहे.

दोन दिवसापूर्वी एका मोठ्या वर्तमान पत्रात तरतूद लाखांची आणि खर्च कोटींचा अशी बातमी प्रसिद्ध झाली होती तर या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने आदेश काढून फक्त बारा पत्रकारांना संधी देऊन उर्वरित अनेक दैनिक वर्तमान पत्रांच्या जिला प्रतिनिधींना राज्यपाल महोदयांना भेटण्यास मज्जाव करण्यात आले आहेत हे विशेष…

जनतेच्या विद्यापीठाकडून करण्यात आले माजी आमदार हिरामण वरखडे यांचे सन्मान…

ग्राम सभांना बळकट करणारे माजी आमदार हिरामण वरखडे यांना जनतेच्या विद्यापीठाकडून पदवी देऊन गौरविण्यात आले असून या द्वारे संघटनांनी गोंडवाना विद्यापीठाचे जाहीर निषेध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here