एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार…महामार्ग वाहतूक विभाग आपसी झगड्यात व्यस्त….?

0
1071
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

गडचिरोली: नागपूर वरून गडचिरोली कडे येणाऱ्या एसटी बस क्रमांक एम एच ४० ए क्यू ६४२३ ने दुचाकी स्वार व्यक्तीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार व्यक्ती जागीच ठार झाला.ही घटना आज दुपारी साडे बारा वाजताच्या सुमारास पोर्ला  टी पॉइंट वर घडली. अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव अनिल देवराव वट्टी वय 40 वर्ष राहणार पीपरटोला तालुका गडचिरोली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत मृतकाचे शव विच्छेदन करीता सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.

या महामार्गावर सतत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते,तसेच चार ही रस्त्यांवर अशा बिघडलेल्या अस्तव्यस्त वाहतुकीकडे महामार्ग पोलीस विभागाचे  वाहन धारकांची जनजागृती, प्रबोधन करणे तसेच वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या वाहनधारकांचे चालान करण्याकडे महामार्ग वाहतूक पोलिसांकडून सतत दुर्लक्ष असून, आज जर या महामार्गावर वाहतूक पोलिस कर्मचारी असते तर हा अपघात झालाच नसता अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शी लोकांनी महाराष्ट्र माझाच्या प्रतिनिधीकडे बोलून दाखवली.

गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या चारही महामार्गांवर महत्वाच्या ठिकाणीच महामार्ग पोलिसांची उपस्थिती राहत नसल्यामुळे वारंवार अपघात घडण्याचे सत्र सतत सुरूच असल्याचे विदारक चित्र चालू झाल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here