विज खांबावर च शॉक लागून लाईन मन चा दुर्दैवी मृत्यू ….

0
1339

 

गडचिरोली: शहरातील इंदिरा गांधी चौकापासून हाके च्या अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद शाळेजवळ वीज खांबावर दुरुस्ती साठी चढलेल्या एका लाईनमनचा विजेचा झटका लागून खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेअकरा वाजताच्या दरम्यान घडली.

मृतक लाईनमन चे नाव जितेंद्र गज्जलवार वय ४५ रा. आरमोरी रोड गडचिरोली असून वीज खांबावर चढताना वीज पुरवठा बंद करूनच चढण्याचा प्रकार असताना सुद्धा या व्यक्तीला करंट कशामुळे लागला ही गुंतागुंतीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली होती, या अपघाताची माहिती त्वरित पोलीस ठाण्याला कळवली असताना सुध्दा हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातून अर्ध्या तासापर्यंत कुठलाही कर्मचारी घटनास्थळी पोहोचलेला नव्हता हे विशेष…

अपघात झालेल्या ठिकाणी वीज खांबाच्या अगदी खालच्या बाजूला एका ठिकाणी भाजीपाला विकणाऱ्या व्यक्तीने दुकान थाटलेली असून, लोखंडी पत्र्यापासून बनलेला एक ठेला सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेला दिसून आला होता. या ठिकाणी वीज खांबा च्या अगदी खालच्या बाजूला अतिक्रमण असल्याने, तसेच त्या ठिकाणी लाईनमॅनच्या विजखांबावर चढण्याच्या वेळेस होणाऱ्या खबरदारीत कशी चूक घडली याचा उलगडा तपासानंतरच होईल अशी बाब वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवलेली आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणा आल्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे.

वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराची चौकशी करण्याची आणि मृतक लाईनमॅनच्या कुटुंबाला ताबडतोब आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक परिसरातील नागरिकांनी यावेळी केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here