गेंड्याची कातडी पांघरून झोपलेल्या वन विभागाची यंत्रणा केंव्हा जागणार…
दिनांक.१५/१२/२०२३
गडचिरोली: जिल्हा मुख्यालय पासून अवघ्या बारा किलोमिटर अंतरावर असलेल्या चामोर्शी रोड वरील गोविंद पुर या गावात जंगलात केरसुणी आणायला गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान घडली.
वन विभागाच्या वतीने वारंवार जंगल परिसरात जायला मनाई करण्यात आल्या नंतर सुध्दा ही महिला जंगलात गेल्याने एका ठिकाणी दबा धरून बसलेल्या नरभक्षी वाघाच्या जबड्यात सापडून या महिलेचा करून अंत झाला होता.
वाघाच्या हल्यात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव माया बाई सातपुते वय ५५ वर्ष असून ती गोविंदपूर या गावचीच रहिवासी आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलिस यंत्रणा घटनास्थळी पोहचली होती.घटनास्थळ पंचनामा करण्यात आल्या नंतर मृतदेह शव विच्छेदनसाठी सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाच्या वतीने कुठलाही प्रयत्न होत नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झालेली असून,भविष्यात या नरभक्षक वाघांमुळे किती निष्पाप लोकांचा बळी जाईल याचा विचार न केलेलाच बरा…